Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण म्हणतं भात खाल्ल्यानं पोट सुटतं? वरण भात खाण्याचे ५ फायदे, कायम राहाल मेंटेन

कोण म्हणतं भात खाल्ल्यानं पोट सुटतं? वरण भात खाण्याचे ५ फायदे, कायम राहाल मेंटेन

Here is why Dal Chawal is the ultimate comfort food : जे लोक वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात त्यांनी आपल्या आहारात खिचडी किंवा डाळ भाताचे सेवन करायला हवे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:51 PM2023-08-01T12:51:12+5:302023-08-01T16:07:15+5:30

Here is why Dal Chawal is the ultimate comfort food : जे लोक वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात त्यांनी आपल्या आहारात खिचडी किंवा डाळ भाताचे सेवन करायला हवे.

Here is why Dal Chawal is the ultimate comfort food : Eat Dal Chawal in dinner to loose weight | कोण म्हणतं भात खाल्ल्यानं पोट सुटतं? वरण भात खाण्याचे ५ फायदे, कायम राहाल मेंटेन

कोण म्हणतं भात खाल्ल्यानं पोट सुटतं? वरण भात खाण्याचे ५ फायदे, कायम राहाल मेंटेन

भारताच्या प्रत्येक घरामध्ये रोज वरण भात किंवा पुलाव, खिचडी असे तांदळाचे पदार्थ बनले जातात. डाळ भात हा रोजच्या खाण्यातील एक प्रसिद्ध पदार्थापैकी  एक आहे. तज्ज्ञांच्यामते डाळ भात  लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांची वाढ चांगली होते. याशिवाय शरीराला भरपूर फायदे मिळतात. यात अनेक पोषक तत्व असतात. (Here is why Dal Chawal is the ultimate comfort food)

शरीराला उर्जा देण्याबरोबरच इम्यूनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. जे लोक वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात त्यांनी आपल्या आहारात खिचडी किंवा डाळ भाताचे सेवन करायला हवे. अनेकजण वजन वाढेल म्हणून भात खाणं सोडतात तर  काहीजण रात्रीच्या वेळेस भात खात नाहीत. (Eat Dal Chawal in dinner to loose weight)

डाळीत अनेक पोषक तत्व असतात. शरीरासाठी डाळींचे सेवन फायदेशीर ठरते. डाळीत फायबर्स, व्हिटामीन बी, मॅग्नेशियन, जिंक आणि पोटॅशियम असते. शरीरासाठी ही पोषक तत्व  गरजेची असतात. डाळीत कमीत कमी प्रमाणात फॅट असते. खनिज, व्हिटामीन्, एंटी ऑक्सिडंट्स आणि पचन क्रिया चांगली राहण्यासाठी डाळी फायदेशीर ठरतात. डाळी पचायला हलक्या असतात. याशिवाय बराचवेळ पोट भरलेलं राहतं.

वजन कमी करण्यासाठी भात कसा फायदेशीर ठरतो?

१) भूक न लागल्यामुळे तुम्ही जास्त खाणं टाळता आणि वजनही नियंत्रणात राहतं.  डाळीप्रमाणेच तांदळातच सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायडेट्स, प्रोटीन्स, फायबर्स, मॅग्नेशियन, आयर्न आणि कॅल्शियम असते. भात खाल्ल्यानं शरीराला उर्जा मिळते.  तांदळात  नुकसानकारक फॅट्स, कोलेस्टेरॉल आणि सोडीयम वाढवणारे घटक नसतात.  तांदूळ एक बॅलेन्स डाएट आहे. 

२) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतात. अनेकांचं असं म्हणणं आहे की भात  खाल्ल्यानं वजन वाढतं.  पण डाळ भाताचे योग्य पद्धतीनं योग्यवेळी सेवन केल्यास वजन कमी करणं सहज शक्य होतं. डाळ-तांदळाचं कॉम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं.

३) तज्ज्ञांच्यामते रात्रीच्या जेवणात जर योग्य प्रमाणात भात खाल्ला तर तुम्हाला तब्येतीवर चांगला परिणाम झालेला दिसेल.
डाळ भात खाताना  एका गोष्टीची काळजी घ्या ते म्हणजे भात कमी आणि डाळ जास्त प्रमाणात खा.

४) डाळ भाताचा कॉम्बो तुम्ही तुपासह खाल्ल्यानं एक संतुलित आहार बनेल. तुपात व्हिटामीन ए, डी, ई, के असते जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. 

५) व्हाईट राईसऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता.  यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते, याशिवाय पचायलाही हा भात हलका असतो. 
 

Web Title: Here is why Dal Chawal is the ultimate comfort food : Eat Dal Chawal in dinner to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.