निरोगी राहण्यासाठी कमी तेलकट पदार्थ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात (Cooking Oil). तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरात गंभीर आजारांचा धोका वाढतो. तेल जितकं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Weight Loss). तितकेच त्याचे तोटे देखील आहेत (Fitness). पदार्थ शिजवण्यासाठी चमचाभर का असेना तेलाचा वापर होतो (Health Tips).
त्यामुळे तेल आपण पूर्णपणे टाळू शकत नाही. पण त्याचे वापरण्याचे प्रमाण नक्कीच कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी आहारात नक्की किती तेलाचे प्रमाण असावे. याची माहिती आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी दिली आहे(Here's How Much Cooking Oil You Should Consume in a Day).
यांसंदर्भात तज्ज्ञ सांगतात, 'आहारात जास्त तेलाचा वापर टाळावा. कारण त्यात अनेक प्रकारचे फॅट्स असतात. तेलामध्ये आढळणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. यामुळेच लोकांनी दिवसातून फक्त ४ ते ६ चमचे तेलाचा वापर करावा. आपण आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार तेलाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. पण स्वयंपाकासाठी उत्तम दर्जाचेच तेल वापरावे.'
दूध पिता पिता दगावलं तान्हं बाळ, व्हायरल बातमी : स्तनपान करताना आईने काय काळजी घ्यायला हवी?
स्वयंपाकात तेलाचे प्रमाण किती असावे?
- आहारतज्ज्ञांच्या मते, आपल्या आरोग्यासाठी तेल आवश्यक आहे. कारण त्यात फॅट्स असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. मात्र, जास्त प्रमाणात तेलाचा वापर करू नये. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
- डब्ल्यूएचओच्या मते, जर एखादी व्यक्ती २००० कॅलरीजचा आहार घेत असेल तर सुमारे ४०० - ७०० कॅलरीज चरबीपासून मिळणे आवश्यक आहे. तेल व्यतिरिक्त बहुतांश अन्नपदार्थांमध्ये फॅट्स असतात. त्यामुळे तेलाचा वापर नियंत्रित प्रमाणात करायला हवे.
करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर
- निरोगी राहण्यासाठी लोकांनी सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करायला हवे. जे ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, नट ऑइल आणि सीड्स ऑइलमध्ये आढळतात. हे शरीरासाठी उत्तम मानले जाते. यामुळे हृदयाचा धोकाही कमी होतो.