Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल..

वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल..

High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis : लठ्ठपणा कमी करणारं पीठ; रोज एक भाकरी बनवून खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 04:58 PM2024-06-13T16:58:53+5:302024-06-13T16:59:52+5:30

High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis : लठ्ठपणा कमी करणारं पीठ; रोज एक भाकरी बनवून खा..

High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis | वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल..

वजन वाढेल म्हणून गव्हाची पोळी खाणं टाळताय? रोज खा 'या' पिठाची भाकरी; मबघा कमाल..

लठ्ठपणामुळे शरीर तर बेढप दिसतेच, शिवाय इतरही आजार शरीराला ग्रासतात (Weight gain problem). मधुमेह, थायरॉईड, कोलेस्टेरॉल यासह हृदय विकाराचा झटका याचा देखील समावेश आहे (Health Tips). वजन कमी करण्यासाठी आपण सर्वात आधी चपाती किंवा भात खाणं टाळतो (Jowar Bhakri).

जर आपल्याला वजन कमी करताना गव्हाच्या पोळ्या खायच्या नसतील तर, ज्वारीच्या भाकऱ्या खा (Fitness). यासाठी आपल्याला विशेष डायटींग करण्याचीही गरज नाही. आपण ज्वारीच्या भाकऱ्या खाऊनही वेट लॉस करू शकता(High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis).

वेट लॉससाठी ज्वारीच्या भाकऱ्या

ज्वारीचे पीठ वेट लॉससाठी मदत करते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होऊ शकते. मुख्य म्हणजे ज्वारी चयापचय क्रिया बुस्ट करते. टेलर आणि फ्रांसिसच्या रिसर्चनुसार, 'लठ्ठपणा कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी मदत करू शकते. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स आढळते. ज्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक

शरीराची सूज करते कमी

ज्वारीचे पीठ त्याच्या फिनोलिक संयुगांसाठी ओळखले जाते. जे अँटीऑक्सिडंट्ससारखे काम करते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेले अन्न दाहक-विरोधी प्रभाव दर्शवतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात.

पचनासाठी फायदेशीर

ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. त्याचबरोबर ज्वारी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयोगी

मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. ज्वारीतील पौष्टीक घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. शिवाय उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहा. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. पण ज्वारी हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते.

ग्लुटेन फ्री अन्न

ज्वारी पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहे. ज्यामुळे सेलिआक रोगापासून आराम मिळतो. गहू, बार्ली, राई इत्यादींमध्ये ग्लूटेन आढळते. म्हणून आपण ज्वारीची भाकरी खाऊ शकता.

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

कर्करोग होण्याचा धोका कमी

काही अभ्यासानुसार ज्वारीमध्ये विशेष प्रकारचे फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. संपूर्ण धान्य खाल्ल्याने पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असेही संशोधनात दिसून आले आहे.

Web Title: High Cholesterol Control To Weight Loss, 6 Reasons Why Jowar Bhakri Can Be Your Alternative To Regular Atta Rotis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.