Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

Home Made High protein Shake for Weight Loss : प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 12:29 PM2022-08-23T12:29:16+5:302022-08-23T12:31:58+5:30

Home Made High protein Shake for Weight Loss : प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात.

Home Made High protein Shake for Weight Loss : Buying Expensive Protein Powder? Protein shake will be ready at home in 5 minutes, easy recipe... | महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

Highlightsप्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत असल्याने याचा तुम्ही आहारात नक्की समावेश करु शकता.      प्रोटीन पावडर म्हटली की ती साधारणपणे गोड असते. पण त्यापेक्षा ही आंबट-खारट चवीची प्रोटीन पावडर घ्यायला जास्त बरी वाटते.

प्रोटीन हा आपल्या शरारीसाठी एक आवश्यक घटक असून त्याचे प्रमाण चांगले राहावे यासाठी आपण आहारात दूध, अंडी, डाळी, मांसाहारी पदार्थ अशा गोष्टींचा समावेश करतो. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते.  केवळ मांसाहार केला म्हणजेच आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात असे नाही. तर त्याशिवायही अनेक पदार्थांमधून आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागू शकते. आजकाल प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात (Home Made High protein Shake for Weight Loss). 

मानवी शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला वारंवार प्रोटीनचा पुरवठा करण्याची गरज असते.  प्रोटीन पावडर हा प्रोटीनचा काही नैसर्गिक स्त्रोत नाही. त्यामुळे प्रोटीन पावडर तयार करताना त्यात अर्थातच साखर, आर्टिफिशियल रंग, फ्लेवर्ससाठी वेगवेगळे पदार्थ, केमिकल्स टाकले जातात. एक चमचा प्रोटीन पावडरद्वारे शरीराला १० ते ३० ग्रॅम प्रोटीन मिळते. पण प्रत्येकाचे वय, वजन, कामाची पद्धत, फिटनेस लेव्हल पाहता प्रत्येकाची प्रोटीनची गरज वेगवेगळी असते. बाजारात विविध कंपन्या प्रोटीन शेक विकत असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. 

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण ही प्रोटीन पावडर किंवा शेक घेत असल्याचे आपण बघतो. प्रोटीन्स शरीरासाठी चांगले असले तरी ते किती प्रमाणात, कोणत्या वेळेला घ्यायचे याची माहिती असणे आवश्यक असते. याचे प्रमाण, वेळ चुकले तर मात्र आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरची किंमतही खूप जास्त असते. अशावेळी आपण घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन प्रोटीन पावडर तयार केली तर? प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट आणि डायटीशियन असलेल्या शिखा अग्रवाल शर्मा याची खास रेसिपी सांगतात....

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. पाणी - १ ग्लास (सामान्य तापमानाचे)

२. सातू पीठ - ३ ते ४ चमचे

३. काळं मीठ - मोठा चमचा 

४. जीरे पावडर - १ चमचा 

५. लिंबाचा रस - १ चमचा

कृती -

१. सातूचे पीठ, काळ मिठ आणि जीरे पावडर एकत्र करुन घ्या.

२. त्यामध्ये लिंबाचा रस आणि पाणी घालून ते एकत्र करा.

३. एकजीव होण्यासाठी तुम्ही ब्लेंडर किंवा शेकरचा वापर करु शकता. 

४. प्रोटीन पावडर म्हटली की ती साधारणपणे गोड असते. पण त्यापेक्षा ही आंबट-खारट चवीची प्रोटीन पावडर व्यायाम झाल्यावर घेतली तर तुम्हाला भरपूर ताकद मिळेल. 

५. व्यायामादरम्यान बरीच ऊर्जा खर्च होते, ती भरुन निघण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी सातूचे पीठ अतिशय उपयुक्त ठरते. प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत असल्याने याचा तुम्ही आहारात नक्की समावेश करु शकता.      


 

Web Title: Home Made High protein Shake for Weight Loss : Buying Expensive Protein Powder? Protein shake will be ready at home in 5 minutes, easy recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.