Join us  

ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करणारा खास हर्बल टी! रोज सकाळी प्या.. ॲसिडीटी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 3:17 PM

Herbal tea for reducing acidity and migraine: ॲसिडीटी, मायग्रेन migraine आणि अपचनाचा त्रास वारंवार होत असेल तर रोज सकाळी चहा घेण्याऐवजी हा हर्बल टी (herbal tea) घ्या. थोड्याच दिवसांत त्रास कमी होईल.

ठळक मुद्देकाही दिवस नियमितपणे असा हर्बल चहा घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास नक्कीच कमी होईल.

जेवणाच्या वेळा, ताटातले पदार्थ, झोपेचे तास यात थोडं जरी मागे- पुढे झालं, तरी अनेकांना लगेच ॲसिडीटी, अपचन (acidity, indigestion and migraine) असा त्रास होऊ लागतो. मायग्रेनचा त्रासही अनेक जणांना असतो. ॲसिडीटी असो किंवा मग मायग्रेन. हे दोन्ही त्रास कधी सुरू होतील, काहीच सांगता येत नाही. त्यामुळेच तर हे दोन्ही त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी खास उपाय सांगितला आहे. त्यांच्या drdixa_healingsouls या इन्स्टाग्राम पेजवर त्यांनी हे उपाय शेअर केले आहेत. (Ayurvedic remedies for reducing acidity and

)

 

 

ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास होण्याची कारणं१. तब्येतीच्या या दोन्ही तक्रारी सुरू होण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पित्तदोष आणि वातप्रकृती वाढणे.

२. मसालेदार, खारट, आंबट आणि आंबवलेले पदार्थ वारंवार खाणे.

३. शिळे अन्न आणि फ्रिजमध्ये अधिक काळ ठेवून नंतर गरम केलेले अन्न वारंवार खाणे.

आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

४. मांसाहारी पदार्थांचे अतिसेवन

५. कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करणे

६. रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे

७. अतिराग आणि ताणतणाव, खूप जास्त प्रवास किंवा झोपेच्या वेळा चुकणे.

 

ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी...वरील कारणं टाळणं हे आपल्या हातात आहे. पण तरीही काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही तर दररोज सकाळी चहा किंवा कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करणे तरी टाळायला पाहिजे. कारण त्यामुळे शरीरातील पित्त दोष वाढतो. पित्त वाढले की अनेकांना छातीत जळजळ होऊन ॲसिडीटी, मायग्रेनचा त्रास सुरू होतो. 

 

कसा करायचा हर्बल टी?साहित्य१ ग्लास पाणी, १ टेबलस्पून धने, १ टीस्पून बडिशेप, ५ ते ७ पुदिन्याची पानं, कढीपत्त्याची १० पानं. कृतीहे सगळे साहित्य एका पातेल्यात टाका आणि ३ ते ५ मिनिटे हे सगळं साहित्य व्यवस्थित उकळू द्या. त्यानंतर हा चहा गाळून घ्या आणि गरमागरम चहा किंवा काढा दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. काही दिवस नियमितपणे असा हर्बल चहा घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास नक्कीच कमी होईल.  

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय