चुकीची जीवनशैली खराब लाईफस्टाईलमुळे आजकाल बरेच लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. पोटाची चरबी जर वाढली असेल तर कपड्यांची फिटींग व्यवस्थित बसत नाही आणि ओव्हरऑल लूक खराब होतो (Homemade Drink To Reduce Belly Fat). जर तुम्हालाही थुलथुलीत पोट कमी करायचं असेल तर हर्बल चहाचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे पोट फ्लॅट होईल. आहारतज्ज्ञ आईना सिंगला यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How To Loss Belly Fat Naturally)
पोट कमी करण्याचं ड्रिंक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
३ ते ४ केसराच्या काड्या,
अर्धा चमचा अश्वगंधा पावडर,
अर्धा इंच बारीक केलेलं आलं,
अर्धा चमचा दालचिनी पावडर,
१ चमचा मध,
एक ग्लास पाणी.
सगळ्यात आधी गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात बारीक केलेलं आलं, दालचिनी पावडर घालून ५ मिनिटं उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा. त्यात केशराच्या काड्या किंवा अश्वगंधा पावडर घाला. व्यवस्थित मिसळून ३ ते ५ मिनिटं झाकून ठेवा. चहाची गाळणी घेऊन थोडं कोमट झाल्यानंतर मध घालून एक-एक सिप करून प्या.
केसरात एंटीऑक्सिडेंट्सचे गुण असतात ज्यामुळे ताणतणाव कमी करता येतो. मूड नियंत्रणात राहतो. शरीरातील कॉर्टिसोल हॉर्मोलचा स्तर नियंत्रित राहतो. पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होण्याचं मुख्य कारण कॉर्टीसोल असते. अश्वगंधा कोर्टीसोलचा स्तर कमी करते आणि शरीरातील ताण-तणाव कमी करते. आलं आणि दालचिनी पचनक्रिया चांगली ठेवते. ब्लड शुगर स्थिर ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही. हा चहा प्यायल्यानं फक्त पोटाची चरबी जमा होत नाही तर मानसिक स्थितीही चांगली राहते.