Join us  

पोट-कंबर खूपच सुटलं? १ चिमूटभर 'ही' घरगुती पावडर खा, झरझर होईल वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:42 PM

Homemade Powder For Weight Loss : जर तुम्हाला जास्त मेहनत न करता वजन कमी करायचं असेल तर शेफ मेघना कामदार यांनी वजन कमी करण्यासाठी एक पावडर सांगितली आहे.

वजन (Weight Loss Tips) कमी करण्यासाठी लोक जिमपासून, डाएटपासून सर्व काही करतात. पोटाचा घेर कमी करण्यासाठी जीमला जाणं, डाएट करणं सर्वांनाच जमतं असं नाही. (Health Tips) लठ्ठपणा ही एक वाढती समस्या आहे. कॅन्सर, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारखे गंभीर आजार यामुळे उद्भवू शकतात. (Homemade Powder For Weight Loss) जर तुम्हाला जास्त मेहनत न करता वजन कमी करायचं असेल तर शेफ मेघना कामदार यांनी वजन कमी करण्यासाठी एक पावडर सांगितली आहे. ज्यामुळे काही दिवसातंच तुमचं वजन कमी होईल. (Homemade Powder Recipe For weight Loss And Gut Problem By Experts)

वजन कमी करण्यासाठी पावडर कशी तयार करावी? (How To Make Weight Loss Powder)

जीरं, ओवा आणि बडिशेप हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित प्रमाणात घेऊन व्यवस्थित भाजून घ्या. थंड झाल्यानंतर याची पावडर बनवून घ्या. ही पावडर एका काचेच्या भांड्यात ठेवा. त्यांनी सांगितले की हे मिश्रण तुम्ही  सकाळी, दुपारी आणि रात्री जेवणाआधी १ ग्लास पाण्यात १ चमचा घाला. (Ref) त्यात अर्धा लिंबांचा रस मिसळून प्या. ज्यामुळे पोट फुगणं, अपचन  आणि झोप न येण्याची समस्या कमी होईल.

ओव्याचे फायदे

ओव्यात कॅल्शियम, आयर्न, फायबर्स आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. चरबी कमी होण्यास मदत होते. भूक कमी लागते आणि आतडे साफ राहण्यास मदत होते. कमी कॅलरीजयुक्त फूड्स फायबर्सने परिपूर्ण असतात. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते, शरीरात पाणी जमा होत नाही पचनक्रिया चांगली  राहते. याशिवाय व्हिटामीन, मिनरल्स, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. शरीराला उर्जा मिळते. ताण-तणाव कमी होतो. युरिनल ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टळतो आणि हॉर्मोनल संतुलन राहते. 

सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!

लिंबू

लिंबात व्हिटामीन सी, सिट्रिक एसिड असते. ज्यामुळे शरीरातील घाण कमी होते. लिंबू वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली बनवण्यासाठी, उर्जेचा स्तर आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

पटकन वजन कमी करण्यासाठी कोणतं पाणी प्यावं गरम की थंड? वेट लॉससाठी एक्सपर्ट्स सांगतात.....

जीरं

जीऱ्यात थर्मोजेनिक गुण शरीराचे तापमान वाढवतात ज्यामुळे चयापचनाची सुधारते. जीरं पचनतंत्र मजबूत ठेवते. यामुळे गॅस, अपचन, गॅस,सूज येणं अशा समस्या कमी होतात. जीऱ्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. नियमित जीऱ्याच्या सेवनाने शरीरात फॅट्स जमा होत नाहीत.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य