Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

Surprising Health Benefits of Warm Water with Honey : benefits of drinking honey with warm water : Health Benefits of Warm Water with Lemon and Honey : Honey For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यांत मिसळा 'हा' पदार्थ आणि पाहा फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 23:19 IST2025-01-25T23:15:11+5:302025-01-25T23:19:31+5:30

Surprising Health Benefits of Warm Water with Honey : benefits of drinking honey with warm water : Health Benefits of Warm Water with Lemon and Honey : Honey For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यांत मिसळा 'हा' पदार्थ आणि पाहा फरक...

Honey For Weight Loss Surprising Health Benefits of Warm Water with Honey Health Benefits of Warm Water with Lemon and Honey | कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

सध्या आपल्यापैकी बरेचजण वाढलेलं वजन आणि पुढे आलेल्या पोटाच्या ढेरीमुळे त्रस्त आहेत. आपलं वजन आणि पोट योग्य मापात असावं असं प्रत्येकाला वाटत. परंतु वाढलेलं वजन आणि पोट कमी करणे म्हणजे महाकठीण काम असते. अनेकजण वजन कमी करुन बारीक होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आणि उपाय करून पाहतात. वजन कमी करण्याचे अनेक फंडे (Honey For Weight Loss) सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बरीच औषधं देखील वजन कमी करण्यासाठी घेतली जातात. पण वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट या दोन गोष्टीच प्रामुख्याने महत्वाच्या ठरतात(Surprising Health Benefits of Warm Water with Honey).

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून पिणे हा साधा सोपा उपाय आपण अनेकदा ऐकला आणि आजमावलाही असेल. वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये हा उपाय सर्वात पाहिल्या स्थानांवर असेल. आपल्यापैकी बरेचजण सकाळी उठून रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळून कोमट पाणी पितात.  कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध घालूंन हे डिटॉक्स वॉटर आपण वजन कमी करण्यासाठी पिऊ शकतो. या डिटॉक्स वॉटरमध्ये कॅलरीज देखील कमी असतात. हे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यासोबतच हे डिटॉक्स वॉटर पिण्याचे आपल्या आरोग्याला इतर अनेक फायदेसुद्धा मिळतात. वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पाणी नेमके कधी आणि कसे प्यावे, याबद्दल अनेकांना बरीचशी माहिती नसते. यासाठी वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पाणी नेमके कधी आणि कसे प्यावे याबद्दल अधिक माहिती समजून घेऊयात. 

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यांत मिसळा चमचाभर मध... 

आयुर्वेदात मधाला खूप महत्व आहे. याला बेस्ट फॅट बर्नर म्हणूनही ओळखले जाते. मध हा वजन कमी करण्याचा नैसर्गिक उपाय मानला जातो. मध औषधी गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त फिटनेस सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. वजन कमी करण्यासोबत मध आरोग्य सुधारण्यासही मदत करते. शिवाय डोळे, कफ-कोल्ड, स्किन, हृदयाच्या निगडीत समस्या यासोबतच यूरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डरवरही फायदेशीर ठरते.

सुटलेली ढेरी आत जात नाही? करा ३ सोपे एक्सरसाइज, जिम - डाएट न करताही पोट होईल सपाट...

वजन कमी करण्यासाठी मध कसे काम करते? 

मधामध्ये फ्रुक्टोज असते, जे फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरते. जर आपण वजन कमी करण्यासाठी मध खात असाल तर, कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून रिकाम्या पोटी प्या. असे केल्याने पचनक्रिया सुधारते, शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी झरझर घटते. मध, लिंबू आणि कोमट पाणी एकत्रितपणे आपल्या शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते.

चमचाभर गव्हाचे पीठ, पायांच्या भेगा - काळपटपणा छूमंतर! घ्या उपाय, वाटेल आधीच का नाही केला...

वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी कधी प्यावे ?

लिंबू आणि मधाचे पाणी तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता. हे पाणी तुम्ही सकाळी, दुपारी किंवा रात्री कधीही घेऊ शकता. पण, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी (Drinking Honey Water every morning) लिंबू आणि मधाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. दररोज सकाळी (benefits of drinking honey with warm water) रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास अधिक मदत होते. यासाठी मध शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे असावे, भेसळयुक्त मधाचा वापर करणे टाळावे(Surprising Health Benefits of Warm Water with Honey).

वजन कमी करण्यासाठी लिंबू मध पाणी कसे प्यावे ?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर त्यात १ टेबलस्पून  शुद्ध मध घाला. हे पाणी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काही महिने दररोज लिंबू आणि मध पाणी पिऊ शकता. योग्य डाएट आणि एक्सरसाइज सोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होते.

Web Title: Honey For Weight Loss Surprising Health Benefits of Warm Water with Honey Health Benefits of Warm Water with Lemon and Honey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.