Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्या लोणी घालून काॅफी, होईल वजन कमी! करा कॉफीचा औषधासारखा वापर..

प्या लोणी घालून काॅफी, होईल वजन कमी! करा कॉफीचा औषधासारखा वापर..

वजन कमी करण्यासाठी (weight loss) चहा काॅफी सोडण्याचा सल्ला दिला जातो. पण लोणी घालून तयार केलेली बटर काॅफी प्यायल्यानं (butter coffee for weight loss) मात्र वजन कमी होतं असं एक अभ्यास सांगतो. बटर काॅफीनं वजन कमी कसं होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 05:11 PM2022-09-03T17:11:17+5:302022-09-03T17:23:43+5:30

वजन कमी करण्यासाठी (weight loss) चहा काॅफी सोडण्याचा सल्ला दिला जातो. पण लोणी घालून तयार केलेली बटर काॅफी प्यायल्यानं (butter coffee for weight loss) मात्र वजन कमी होतं असं एक अभ्यास सांगतो. बटर काॅफीनं वजन कमी कसं होतं?

How butter coffee is helpful in weight loss journey? | प्या लोणी घालून काॅफी, होईल वजन कमी! करा कॉफीचा औषधासारखा वापर..

प्या लोणी घालून काॅफी, होईल वजन कमी! करा कॉफीचा औषधासारखा वापर..

Highlightsबटर काॅफी करतान त्यात खोबऱ्याचं तेलही घातलं जातं. बटर काॅफी प्यायल्यानं भूक कमी लागते.शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बटर काॅफीचा उपयोग होतो. 

वजन कमी करण्यासाठी (weight loss)  काय खाऊ नये याची यादी  करताना चहा, काॅफी, मसालेदार पदार्थ, ब्रेड, साखर, तेल तूप यांचा समावेश होतो. वजन कमी होण्यासाठी हे पदार्थ सोडण्याचा, कमी करण्याचा सल्ला दिला जातो. या यादीत समाविष्ट असलेल्या काॅफीचा (coffee for weight loss)  मात्र वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो हे एका अभ्यासात आढळून आलं आहे. यासाठी आपण  नेहमी करतो तशी काॅफी नाही तर लोणी घालून केलेली बटर काॅफी ( butter coffee is important in weight loss journey)  पिणं आवश्यक आहे असं हा अभ्यास म्हणतो. चवीला उत्कृष्ट लागणारी ही काॅफी वजन कमी होण्यासाठी तर फायदेशीर (benefits of butter coffee)  आहेच सोबतच मेंदू आणि मनाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. 

Image: Google

'अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशन' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार काॅफीमध्ये लोणी घालून प्यायल्यास वजन कमी होण्यासाठी त्याची मदत होते. ही बटर काॅफी शरीराला त्वरित ऊर्जा देते तसेच शारीरिक क्षमताही वाढवते असं या शोधात म्हटलं आहे.

Image: Google

बटर काॅफी प्यायल्यानं काय होतं?

1. बटर काॅफीमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. ही काॅफी प्यायल्यानं पोट दीर्घ काळ भरलेलं राहातं. त्यामुळे सारखी खाण्याची इच्छा होत नाही. या कारणामुळे बटर काॅफी प्यायल्यानं वजन कमी व्हायला मदत होते. 

2. वजन कमी करण्यासाठी जे योग साधना करतात, व्यायाम करतात त्यांनी तर बटर काॅफी अवश्य प्यायला हवी असं हा अभ्यास सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर थकवा वाटतो. हा थकवा दूर करण्याचं काम ही बटर काॅफी करते. कारण बटर काॅफी प्यायल्यानं शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. त्यामुळे व्यायामानं येणारा थकवा कमी होतो. 

3. बटर काॅफी करताना खोबऱ्याच्या तेलाचाही समावेश केला जातो. त्यामुळे या काॅफीत एमसीटी तेल नावाचा घटक असतो. या घटकामुळे शरीराला आतून मजबूती मिळते. वजन कमी करण्यासाठी कमी उष्मांक असलेला आहार घेत असल्यास बटर काॅफीचा चांगला उपयोग होतो. बटर काॅफीमुळे सारखी भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन कमी होतं. 

Image: Google

बटर काॅफी कशी करतात?

बटर काॅफी करण्यासाठी 2 कप पाणी, 2 चमचे खोबऱ्याचं एल, चिमूटभर दालचिनी, 2 चमचे गाईचं किंवा म्हशीचं लोणी आणि 1 चमचा काॅफी पावडर घ्यावी. बटर काॅफी करताना एक भांड्यात पाणी घ्यावं. पाण्याला चांगली उकळी येवू द्यावी. एका दुसऱ्या भांड्यात खोबऱ्याचं तेल, बटर, दालचिनी पावडर आणि काॅफी पावडर घालून सर्व सामग्री एकत्र करावी.  त्यात गरम पाणी घालावं. हे मिश्रण ब्लेण्डरनं घुसळून घेतल्यास  फेसयुक्त बटर काॅफी तयार होते. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यास फायदेशीर ठरावी यासाठी बटर काॅफीमध्ये दूध आणि साखर घालू नये. 

Web Title: How butter coffee is helpful in weight loss journey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.