Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रात्री झोपताना अंजीर घातलेलं दूध पिण्याचे ५ फायदे, महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी उपाय

रात्री झोपताना अंजीर घातलेलं दूध पिण्याचे ५ फायदे, महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी उपाय

मेनोपाॅज काळात होणारे शारीरिक मानसिक विकार, हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्यांना (women health issue) महिलांना तोंड द्यावं लागतं. या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय म्हणजे अंजीर घातलेलं दूध (fig and milk) पिणं. या एका उपायानं महिलांच्या आरोग्यास 5 फायदे (benefits of fig and milk for women's health) मिळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 05:30 PM2022-07-27T17:30:10+5:302022-07-27T17:43:22+5:30

मेनोपाॅज काळात होणारे शारीरिक मानसिक विकार, हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्यांना (women health issue) महिलांना तोंड द्यावं लागतं. या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय म्हणजे अंजीर घातलेलं दूध (fig and milk) पिणं. या एका उपायानं महिलांच्या आरोग्यास 5 फायदे (benefits of fig and milk for women's health) मिळतात.

How figs and milk benefits for women health. | रात्री झोपताना अंजीर घातलेलं दूध पिण्याचे ५ फायदे, महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी उपाय

रात्री झोपताना अंजीर घातलेलं दूध पिण्याचे ५ फायदे, महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी उपाय

Highlightsअंजीर घालून दूध प्यायल्यानं मेनोपाॅजमधील हार्मोनल असंतुलनाचा धोका टळतो.हाडं मजबूत करण्यासाठी अंजीर आणि दुधाच्या एकत्रित सेवनाचा फायदा होतो.शरीरातील रक्त वाढण्यासाठी अंजीर घातलेलं दूध रोज रात्री प्यावं.

घरातल्या सर्वांच्या आरोग्याचा विचार करण्यात आघाडीवर असलेल्या महिला स्वत:च्या आरोग्याचा विचार करताना मात्र हातचं राखतात. आजारी पडल्यावर आरोग्याचा विचार करतात. पण सुदृढ आरोग्यासाठी आरोग्याचा विचार आधी केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या सहज सुटतात. पाळीच्या दिवसात होणारा त्रास, मेनोपाॅज काळात होणारे शारीरिक मानसिक विकार, हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्यांना (women health issue)  महिलांना तोंड द्यावं लागतं.  या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय म्हणजे रोज रात्री दुधात एकं सुकं अंजीर  उकळून ते दूध  (fig and milk) पिणं. या एका उपायानं शरीरास अनेक पोषक घटक मिळून ( benefits of fig and milk for women health)  महिलांचं आरोग्य सुदृढ राहाण्यास मदत मिळते. 

Image: Google

अंजीरमधे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर, ब6 जीवनसत्व, ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात.  तर दुधात प्रथिनं, कॅल्शियम, अ, ड, क, ई ही जीवनसत्व आणि राइबोफ्लेविन हे घटक असतात. अंजीर आणि दुधातील पोषक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे पाळी आणि मेनोपाॅज दरम्यान होणारे त्रास, हार्मोनल अस्ंतुलन या समस्या कमी होतात. सोबतंच आणि हदयाच्या आरोग्यासाठीही अंजीर आणि दूध यांचं सेवन रोज करणं फायदेशीर ठरतं.

महिलांच्या आरोग्यासाठी अंजीर आणि दूध

1. मेनोपाॅजमधील समस्यांवर फायदेशीर

अंजीर घातलेलं दूध प्यायल्यास मेनोपाॅज दरम्यान जाणवणाऱ्या समस्या कमी होतात. अंजीर आणि दुधाच्या एकत्रित सेवनामुळे प्रथिनं, झिंक, मॅग्नेशियम, लोह हे घटक शरीरात जातात. यामुळे मेनोपाॅजमधील हार्मोनल संतुलन टिकून राहतं. मूड स्विंग होणं, शरीरात वेदना होणं या समस्या कमी होतात. अंजीर घातलेलं दूध प्याल्यानं रात्री झोपही चांगली लागते. 

2. हाडं होतात मजबूत

पुरुषांच्या तुलनेत महिलांची हाडं कमजोर असतात. त्यामुळे हाडांच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष देणं आवश्यक असतं. वय वाढत जातं तशा हाडांच्या समस्या वाढत जातात. अंजीर आणि दुधातून मिळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फाॅस्फरस या घटकांमुळे हाडं मजबूत होतात. 

Image: Google

3. पाळीच्या त्रासात फायदेशीर

पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना खूप रक्तस्त्राव होतो. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासण्याचा धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर अंजीर घालून दूध प्यायल्यास दूध आणि अंजीरमधील लोह शरीरात रक्ताची कमतरता भरुन काढतं. तसेच पाळीत जाणवणाऱ्या पोटात कळा येणं, पोट, कंबर दुखणं या समस्याही कमी होतात. 

Image: Google

4. पचन व्यवस्था सुधारते

पचन क्रिया उत्तम असल्यास आरोग्य चांगलं राहातं, दिवसभर उत्साही वाटतं. बध्दकोष्ठता, गॅसेस, अपचन यासारख्या पचनाशी निगडित समस्या असल्यास अंजीर घातलेलं दूध प्याल्यास फायदा होतो. अंजीरमध्ये असलेल्या फायबरमुळे पचन व्यवस्था सधारते. आतड्यांचं आरोग्यही अंजीरमुळे चांगलं राखलं जातं. 

5. रक्ताची कमतरता होते दूर

बहुतांश महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं कारण शरीरात रक्ताचीच कमतरता असते. अंजीर आणि दुधाच्या एकत्रित सेवनानं शरीरातील रक्त वाढतं. शरीराला प्रथिनं आणि लोह मिळत असल्यानं शरीराला आतून ताकद मिळते. 
 

Web Title: How figs and milk benefits for women health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.