आजकालच्या तणातणावपूर्ण आणि जंकफूडनं भरलेल्या लाईफस्टाईलमध्ये एसिडिटी होणं ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे पोटदुखी, आळस येणं, पोट साफ न होणं या समस्यांचा सामना करावा लागतो. पोटात एसिडिटी निर्माण होणे सामान्य आहे, परंतु यामुळे जळजळ, सूज आणि छातीत दुखणे देखील जाणवू लागते. कधीकधी एसिडिटी इतकी वाढतो की खाल्ल्यानंतर पोटात वेदना होते आणि परिणामी असे लोक अन्नापासून दूर जातात आणि औषधांच्या जवळ जातात. पण रोजच्या घरगुती वापरातील काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही एसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
एसिडिटी ही अन्नाशी संबंधित एक समस्या आहे. त्यामुळे आहार चांगला घेतला तरच तुम्ही एसिडिटीपासून सुटका मिळवू शकता. एसिडिटी कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे यातून मुक्त होण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात काही पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात.
या पदार्थांमुळे होते एसिटिडी
मसालेदार आणि जास्त तेलात तळलेले पदार्थ, फास्ट फूड, चीज, पिझ्झा, सॉसेज, पॅक चिप्स, प्रोसेस्ड फूड आणि लिंबूवर्गीय फळे इ.
कमी एसिडीटीचे अन्न
उच्च फायबर समृद्ध असलेले अन्न आपल्याला एसिडिटीच्या समस्येपासून मुक्त करण्यात मदत करेल. फायबर आपल्या शरीरातील आंबटपणा नियंत्रित करण्यात मदत करते. धान्य, रताळे गाजरं, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, सोयाबीन, केळी आणि फायबर, पोटॅशियम समृध्द इतर फळांचा आहारात समावेश करा.
अल्कलाईन फूड
आपण आपल्या आहारात उच्च पीएच स्तरासह क्षारीय पदार्थांचा समावेश करुन एसिडिटीची समस्या देखील कमी करू शकता. यात केळी, खरबूज, कोबी यांचा समावेश आहे.
पाणीयुक्त पदार्थ
ज्या पदार्थांत पाण्याचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांचे सेवन करायला हवं. त्यामुळे पोट निरोगी राहते आणि एसिडिटीची समस्या देखील कमी होते. काकडी, टरबूज, कलिंगड, लिची यांसारख्या फळांचा आहारात समावेश केल्यास तुमचे शरीर नेहमी हायड्रेट राहील.
हार्ट बर्निंगपासून वाचवणारे पदार्थ
एसिडिटामुळे जर तुमच्या छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवत असेल तर ठंड दूध पिऊ शकता. दुधातील कॅल्शियम, एसिडिटीची तीव्रता कमी करून हार्ट बर्निंग कमी करण्यास मदत करतात.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं आलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पोटाशी संबंधित समस्या कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यात देखील मदत करते. आल्याचे सेवन केल्यास छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.
एसिडिटी असल्यास आंबट पदार्थांचे सेवन करू नये असं सांगितलं जातं. पण लिंबाच्या रसाचे काही थेंब पाण्यासह घेतल्यास पोटातील एसिडिटी कमी होण्यास मदत होते. एसिडिटी कमी करण्यासाठी पाण्यात वेलची घालून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून त्याचे सेवन करा. हा प्रयोग केल्यानं तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
जेवणाआधी या गोष्टी लक्षात ठेवा
काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही.
नाश्ता न करता थेट दुपारी जेवण करणे म्हणजे दरम्यान अनेक तास असतात. यामुळे गॅस आणि अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे नाश्ता असो वा जेवण ते वेळेवर करणे गरजेचे आहे.
जेवणासोबत थंड पेय प्यायल्याने पचन रस आणि एंजाइमचा प्रभाव कमी होतो. यामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.