Join us  

उपाशी राहिल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते, वजन घटते का? 'फास्टिंग' करणे किती फायद्याचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 3:04 PM

How Intermittent Fasting Can Help You Lose Weight फास्टिंग सोडल्याने वजन वाढेल दुपट्टीने, उपाशी राहत असाल तर, हे आजार छळणार म्हणून समजा..

वेट लॉस करणं हे मोठ्या टास्कपेक्षा कमी नाही. वजन जितक्या लवकर वाढते, तितक्याच वेगाने कमी होत नाही. आजच्या पिढीला सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. वजन कमी करताना देखील इन्स्टंट उपायांना फॉलो करतात. पण वजन कमी करताना नियमित व्यायाम, हेल्दी आहार, यासह शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. काही लोकं शॉर्टकट पद्धतीने वजन कमी करायला बघतात, फास्टिंग करतात. एक वेळचं किंवा दोन वेळचं जेवण स्किप करतात. पण याने खरंच वजन कमी होते का? जरी झालं तर, किती वेळापर्यंत आपले शरीर त्याच स्थितीत असू शकते?

वजन कमी करणे, म्हणजे जेवण स्किप करणे नव्हे. आपण दिवसाला किती कॅलरीज इनटेक करत आहोत, तेवढे कॅलरीज बर्न करणे, किंवा त्याहून जास्त घटवणे यालाच वेट लॉस म्हणतात. फास्टिंग केल्यामुळे कॅलरीज तर बर्न होतातचं, परंतु शरीरात पौष्टीक तत्वांची कमतरता भासू लागते(How Intermittent Fasting Can Help You Lose Weight).

फास्टिंग सोडल्याने वाढते वजन

मुंबईस्थित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी, इंडियन एक्स्प्रेस या वेबसाईटला माहिती देताना सांगितले की, 'असे अनेक लोकं आहेत, जे वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट पद्धतीचा वापर करतात. ज्यात फास्टिंग हे खूप कॉमन आहे. फास्टिंग केल्याने वजन कमी होते, पण सोडल्याने पुन्हा शरीर आहे त्या स्थितीत येते. किंवा त्याहून जास्त वजन वाढते.'

प्रोटीन हवं ना ४ शाकाहारी गोष्टी खा, वाढेल काम करण्याची ऊर्जा! सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात..

त्या पुढे सांगतात, 'दीर्घकाळासाठी काहीही न खाल्ल्यामुळे, आपल्याला भूक जास्त लागते. त्यामुळे आपण खाताना जितकी भूक आहे, त्याहून जास्त खातो. खाताना आपण किती खात आहोत, यावर आपले लक्ष नसते. त्यामुळे साहजिक वजन वाढणार. त्यामुळे वेट लॉस करत असताना, योग्य आहार, व्यायाम आणि ८ तासांची झोप आवश्यक आहे.'

भरपूर झोपा, वजन घटेल झटपट! नव्या संशोधनाचा दावा, झोपण्यापूर्वी ४ गोष्टी करा-वजन घटेलच..

उर्जेच्या कमतरतेमुळे शारीरिक होणारे नुकसान

जेव्हा पण लोकं फास्टिंग करतात. तेव्हा शिस्त पद्धतीने याला फॉलो करतात. अधिक काळ उपाशी राहिल्याने चयापचय मंदावते. व शरीरातील उर्जा २० टक्क्यांनी कमी होते. शरीराला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा हवीच. जे अन्नातील पौष्टीक घटकातून मिळते. जर आपण अधिक काळ उपाशी राहिलो, तर थकवा, चक्कर येणे, यासह श्वास घेण्यास अडचण आणि रक्त पंप करण्यासाठी लागणारी उर्जा कमी होते. ज्यामुळे अनेक गंभीर आजार शरीरात वाढू शकतात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य