Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करुन फिटही राहायचं, हे कसं जमणार? ऋजुता दिवेकर सांगतात 6 नियम

वजन कमी करुन फिटही राहायचं, हे कसं जमणार? ऋजुता दिवेकर सांगतात 6 नियम

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय आणि कधी खावं याचे काही शास्त्रीय नियम आहेत. हे नियम ऋजुता दिवेकर सारखी स्टार आहारतज्ज्ञ सांगते तेव्हा त्यांना विशेष महत्त्व असतं. ऋजुता दिवेकर यांनी दिवसभरातला आपला आहार कसा असायला हवा याबाबत इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधे मार्गदर्शन केलं आहे. हे आहार नियम वजन कमी करण्याबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडतात .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 05:01 PM2021-06-29T17:01:51+5:302021-06-29T17:29:39+5:30

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय आणि कधी खावं याचे काही शास्त्रीय नियम आहेत. हे नियम ऋजुता दिवेकर सारखी स्टार आहारतज्ज्ञ सांगते तेव्हा त्यांना विशेष महत्त्व असतं. ऋजुता दिवेकर यांनी दिवसभरातला आपला आहार कसा असायला हवा याबाबत इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधे मार्गदर्शन केलं आहे. हे आहार नियम वजन कमी करण्याबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडतात .

How to lose weight and stay fit? Rujuta Divekar tells 6 rules | वजन कमी करुन फिटही राहायचं, हे कसं जमणार? ऋजुता दिवेकर सांगतात 6 नियम

वजन कमी करुन फिटही राहायचं, हे कसं जमणार? ऋजुता दिवेकर सांगतात 6 नियम

Highlights सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं की दहा पंधरा मिनिटात काहीतरी खायला हवं.दिवसभराच्या खाण्यात सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. नाश्त्याला पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थच असायला हवेत.संध्याकाळी सात ते रात्री साडे आठच्या दरम्यान रात्रीचं जेवण झालेलं असलं पाहिजे.


वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी अनेकजण सतत नवनव्या डाएटच्या शोधात असतात. त्यांनी कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की डाएट फॅड ऐवजी आहाराचे योग्य नियम हेच वजनाला शिस्त लावू शकतात. आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरासोबतच आपल्या मेंदूवरही होतो. म्हणूनच आहाराच्या योग्य शैलीचा अवलंब करणे ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे. वजन नियंत्रित करण्यासोबतच एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय आणि कधी खावं याचे काही शास्त्रीय नियम आहेत. हे नियम ऋजुता दिवेकर सारख्या स्टार आहारतज्ज्ञ सांगतात तेव्हा त्यांना विशेष महत्त्व असतं. ऋजुता दिवेकर यांनी दिवसभरातला आपला आहार कसा असायला हवा याबाबत इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधे मार्गदर्शन केलं आहे. हे आहार नियम वजन कमी करण्याबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडतात , तसेच रोगांपासून आपला बचावही करतात.

उठल्यानंतर पंधरा मिनिटात काहीतरी खा

उठल्यानंतर अनेकजण दोन तीन तास काहीच खात पित नाहीत. ही सगळ्यात मोठी चूक आहे असं ऋजुता म्हणतात. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं की दहा पंधरा मिनिटात काहीतरी खायला हवं. यामुळे आपल्या चयापचय प्रक्रियेला प्रोत्साहन मिळतं. वजन कमी करण्यात ही चयापचय क्रिया महत्त्वाची भूमिका पार पाडते.
सकाळी उठल्यावर काही न खाता केवळ चहा कॉफी घेणं ही धोकादायक बाब आहे. यामुळे पोटात दाह होतो. चहा कॉफीसारखे मसालेदार तीव्र पेय रिकाम्या पोटी घेणं हे एकदम टाळायला हवं. त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर पंधरा मिनिटानंतर सफरचंद किंवा केळासारखं एखादं फळ खायला हवं. किंवा भिजवलेले बदाम अक्रोड खाल्ले तरी चालतात.

दिवसाची सुरुवात योग्य करा!

वजन आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण सकाळी काय खातो याला आत्यंतिक महत्त्व आहे. मात्र नेमकं याच वेळेस चहा, कॉफी, ब्रेड, टोस्ट , मैद्याची बिस्किटं सारखे अपायकारक पेय पिण्याचा , पदार्थ खाण्याचा मोह होतो. या अपायकारक पदार्थांऐवजी आपल्याला कामास ऊर्जा देणारे शिवाय भरपूर काळ पोट भरलेलं ठेवू शकणारे पदार्थ खाण्याची गरज असते. यासाठी हंगामी फळं, नारळाचं पाणी किंवा घरी तयार केलेलं सरबत हे उत्तम पर्याय आहे. भूक मारली जावी यासाठी चहा कॉफी पिणं ही चुकीची बाब असल्याचं ऋजुता दिवेकर म्हणतात. दिवसाची सुरुवात योग्य झाली तरच दिवसभर आपलं आरोग्यही योग्य ट्रॅकवर राहातं.

नाश्त्याला काय?

दिवसभराच्य खाण्यात सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. पण अनेकजण घाईची सबब सांगून नाश्ता करणं टाळतात. ऋजुता म्हणतात हे असं करुन आपण आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान करतो. नाश्त्याला पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थच असायला हवेत. जसे इडली, डोसे, पोहे, आप्पे, पराठे, आंबोळ्या, दलिया वगैरे. हे पदार्थ पोट भरल्याच समाधान देतात. शरीराचं पोषण करतात. सकाळच्या नाश्त्याला पॅकेज्ड फूड खाऊ नये. हे पॅकेज्ड फूड नाश्त्याचे पर्याय म्हणून येत असले तरी ते शरीराची सर्वात जास्त हानी करतात.

जेवण करण्याची योग्य वेळ

आपल्याला जर खर्‍या अर्थानं निरोगी राहायचं असेल तर काय खातो याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आपण केव्हा खातो यालाही आहे. वजन आणि आरोग्य या दोन्हींसाठी सकाळचं जेवण 11 ते दुपारी एकच्या दरम्यान करायला हवं. आठवडाभर भाजी पोळी या एकाच स्वरुपाचं जेवण नसावं. दुपारच्या जेवणात वेगवेगळ्या धान्यांचा समावेश असायला हवा. म्हणूनच पोळीसोबत ज्वारी, बाजरी, नागली, तांदूळ, कळणं, मिश्र पिठाच्या भाकरी असायला हव्यात.

संध्याकाळच्या स्नॅक्सचं पथ्यं

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पाच सहा तासांचं मोठं अंतर असतं. त्यामुळे मधल्या वेळेत मसालेदार, सटर फटर्, गोड, जंक फूड खाण्याची इच्छा होते. पण ऋजुता म्हणतात की संध्याकाळी चार ते सहा या काळात सुका मेवा, घरी बनवलेली गुळ पापडी, मुरमुरे / मक्याचा, साळ्यांच्या लाह्यांचा चिवडा हे पदार्थ खावेत. किंवा दूध घ्यावं. मात्र या काळात चहा कॉफीसारखी पेयं किंवा चटपटीत पदार्थ सेवन करु नये.

रात्रीच्या जेवणात भात-खिचडीला महत्त्व

अनेकजण रात्रीचं जेवण खूप उशिरा करतात. ऋजुता म्हणतात की रात्रीचं जेवण खरंतर झोपण्याआधी कमीत कमी दोन तास आधी करावं. संध्याकाळी सात ते रात्री साडे आठच्या दरम्यान रात्रीचं जेवण झालेलं असलं पाहिजे. रात्रीच्या जेवणात अनेकजण वजनाच्या भीतीने भाताला बगल देतात. पण रात्रीच्या जेवणात डाळ तांदळाची खिचडी, भाताचे वेगवेगळे प्रकार खाऊ शकतात. रात्री पचनासंबंधीच्या तक्रारींपासून दूर राहाण्यासाठी भात खाणं हा योग्य पर्याय आहे. रात्री जेवणात भात खाणं हा हलका आहार आहे.

Web Title: How to lose weight and stay fit? Rujuta Divekar tells 6 rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.