Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

How Many Almonds To Eat Per Day : एका दिवसाला जास्त बदाम खाल्ले तर तब्येतीवर परिणामही होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:45 PM2024-01-06T13:45:26+5:302024-01-06T14:55:29+5:30

How Many Almonds To Eat Per Day : एका दिवसाला जास्त बदाम खाल्ले तर तब्येतीवर परिणामही होऊ शकतो.

How Many Almonds To Eat Per Day : Ayurveda expert on how many almonds eat daily | एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

भिजवलेले बदाम (Almonds) खाणं तब्येतीसाठी फायदेशीर मानलं जातं. अनेकजण बदाम आणि काजू भाजून खातात  तर काहीजण कच्चे खातात. जास्तीत जास्त लोक बदाम खाणं फायदेशीर ठरते म्हणूनच याचे सेवन करतात. (Almonds Eating Tips) बदामात फायबर्स, व्हिटामीन ई, ओमेगा-3, फॅटी एसिड्स, फॉस्फरेस, प्रोटीन्स आणि न्युट्रिएंट्स असतात जे तब्येतीसाठी फायदेशीर मानले जातात. एका दिवसाला जास्त बदाम खाल्ले तर तब्येतीवर परिणामही होऊ शकतो. (How Many Almonds Are Safe to Eat in a Day)

आयुर्वेदीक एक्सपर्ट दीक्षा भावसार यांनी बदाम खाण्याचे सोपे नियम सांगितले आहे. (How Many Almonds Should Eat Per Day) भिजवलेले बदाम खाणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. बदाम किंवा काजू भाजून किंवा कच्चे खाऊ शकता. एक्सपर्टनुसार बदाम खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. बदामात फायबर्स, व्हिटामीन ई, ओमेगा-3, फॅटी एसिड, फॉस्फोरस, प्रोटीन्स आणि न्युट्रिएंट्स मिळतात.

कंबर जाड-पोटाची चरबी सुटलीये? घरीच १ योगासन करा, मेणासारखी वितळेल चरबी-स्लिम दिसाल

एका दिवसाला किती बदाम खावेत? (How many Almonds Should I Eat Per Day)

जर तुम्ही बदाम खाऊन दिवसाची सुरूवात करत असाल तर सगळ्यात आधी २ भिजवलेले बदाम खाऊन दिवसाची सुरूवात करा. रात्री २ भिजवलेले बदाम साल काढून मग खा. दिवसाची सुरूवात २ बदाम खाल्याने शरीरात खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. एका आठवड्याला ५ बदाम खायला हवेत. जर तुम्हाला ब्लोटींग किंवा अपचन होत असेल तर जास्त बदाम खाऊ शकता.

एक्सपर्टच्यामते हळू हळू बदाम खाण्याची संख्या वाढवून तुम्ही रोज १० बदाम खायला सुरूवात करू शकता. ९० दिवस कंटिन्यू तुम्ही १० बदाम खाल्ले तर आरोग्याला बरेच फायदे मिळतील. ज्यांचे डायजेशन चांगले असते जे रोज व्यायाम करतात. जे योग्य प्रमाणात पाणी पितात रोज २० बदाम खाऊ शकतात. बदामात नट्स, हेल्दी फॅट्स, फायबर्स, प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. बदाम पचवणंही कठीण असते. 

बदाम खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Almonds)

बदामात व्हिटामीन ई, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-१२ असते. यात रायबोफ्लोबिन असते. यात आयर्न, पोटॅशियम, जिंक,फॉलेट आणि व्हिटामीन बी असते. यातून शरीराला बरीच ताकद मिळत आणि पीरिएड्स क्रॅप्म्सही उद्भवत नाहीत. बदाम डायजेशन सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगले असते.  यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे बीपी, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Web Title: How Many Almonds To Eat Per Day : Ayurveda expert on how many almonds eat daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.