गुलाबजाम हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. स्वीट म्हटलं की आधी सगळे गुलाबजामचं नाव घेतात. लग्न, पार्टी किंवा सणवार असो, थाळीमध्ये स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असतेच. काहींना जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी काही लोकं गुलाबजाम खाण्यास पसंती दर्शवतात.
काही लोकं एका वेळेला २ - ४ गुलाबजाम संपवतात तर, काही जण गुलाबजाम खाणं टाळतात. गुलाबजामच्या चवीमुळे सतत खावीशी वाटते. पण त्यातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचं काय? गुलाबजाम खाल्ल्याने शरीराला कोणते नुकसान होते? गुलाबजाम खाताना कोणती काळजी घ्यायला हवी? यामुळे कोणते आजार होऊ शकतात? याची माहिती नोएडा स्थित मानस हॉस्पिटलचे डायटीशियन कामिनी कुमारी यांनी दिली आहे(How many calories does one Gulab Jamun have?).
गुलाबजाममध्ये किती कॅलरीज असतात?
आहारतज्ज्ञांच्या मते, एक पीस गुलामजाममध्ये १६० कॅलरीज असतात. याशिवाय त्यामध्ये कार्बोहायड्रेटही खूप जास्त असते. त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील जास्त असते. म्हणून, जर आपण एक गुलाबजामपेक्षा जास्त खात असाल तर, प्रथम त्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल, व ते खाल्ल्याने आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती घ्या.
गुलाबजामच्या (७० ग्रॅम) एका पीसमधील पोषक घटक
कॅलरीज - १६०
कार्ब्स - 24 ग्रॅम
फायबर - 0
खूप जड जेवण झाल्यावर पोटात गुडगुड, अपचनाचा त्रास होतो? जेवताना होणारी १ चूक टाळा
स्टार्च - 0
साखर - २० ग्रॅम
प्रोटीन्स - ४ ग्रॅम
फॅट्स - ७ ग्रॅम
कोलेस्टेरॉल - १७ मिग्रॅ
कॅल्शियम - १३० मिग्रॅ
सोडियम - ५५ ग्रॅम
व्हिटॅमिन ए - ६० एमसीजी
गुलाबजाम खाण्याचे तोटे
शरीरातील साखरेच्या पातळीत वाढ
गुलाबजाम खाल्ल्याने मधुमेहग्रस्त रुग्णांची साखरेची पातळी वाढू शकते. कारण गुलाबजाममध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ७० ग्रॅम गुलाबजाममध्ये २० ग्रॅम साखर असते. त्यामुळे गुलाबजाम कमी खा किंवा खाणे टाळा.
कोलेस्टेरॉलची पातळी वाढते
ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, त्यांनी गुलाबजाम खाणं टाळा. कारण गुलाबजाम खाल्याने शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
वजन वाढते
जर आपण वेट लॉस करत असाल तर, गुलाबजाम खाणं टाळा. यामुळे वजन वाढू शकते. एका गुलाबजाममध्ये ७ ग्रॅम फॅट्स असते. त्यात तेल आणि साखरेचं प्रमाण जास्त असते. जे खाल्ल्याने वजन वाढतं.
घरातली कामं करा आणि कॅलरी जाळा! टोमणे नाही, अभ्यासच सांगतोय, फॅट बर्न करण्याचं नवं सिक्रेट
गुलाबजाम खाताना या गोष्टींची काळजी घ्या
गुलाबजाममध्ये तेल आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे एकापेक्षा जास्त गुलाबजाम खाऊ नका.
मिठाईच्या दुकानातील गुलाबजाम खाण्यापेक्षा घरी तयार करून खा.
मुलांना देखील जास्त गुलाबजाम खायला देणे टाळा, त्यांच्याही आरोग्यासाठी गुलाबजाम चांगले नाही.