Join us  

उपाशी राहून वजन कमी होणार नाही, काय आणि किती खाता ते मोजा.. वजन घटेल झ्टपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2023 12:10 PM

How Many Calories Should You Eat Per Day to Lose Weight? वजन कमी करण्यासाठी जेवण सोडू नका, फक्त कॅलरीज इनटेकवर लक्ष द्या..

वजन कमी करताना डाएटची विशेष काळजी घ्यायला हवी. व्यायामासह डाएट देखील महत्वाचा आहे. आपण व्यायाम करून अनहेल्दी पदार्थ खात असाल तर, वजन कमी होणार नाही. काही लोकं वजन कमी व्हावे म्हणून एक वेळचं जेवण स्किप करतात. पण खाणे - पिणे सोडण्यापेक्षा कॅलरीज इनटेकवर लक्ष द्यायला हवे.

कॅलरीजचे सेवन इतके कमी नसावे की आपल्याला दिवसभर अशक्तपणा जाणवेल, तर ते इतकेही जास्त नसावे की तुमचे वजन वाढेल. मग कॅलरी  इनटेक कशा पद्धतीने करावे? यासंदर्भात, डायटीशियन रिद्धिमा बत्राने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली आहे(How Many Calories Should You Eat Per Day to Lose Weight?).

छोट्या प्लेटमध्ये जेवण करा

आपण म्हणाल छोट्या - मोठ्या प्लेटचा संबंध काय? पण प्रत्यक्षात याचा फरक पडू शकतो. जेव्हा आपण मोठ्या ताटात जेवतो, तेव्हा अन्नाचा मोठा भाग घेतो. त्यामुळे आपण जास्त खातो. जेव्हा आपण लहान ताटात जेवतो, तेव्हा कमी अन्नात ताट भरलेले वाटते. त्यामुळे छोट्या ताटात जेवा. भूक भागली नसल्यास पुन्हा त्याच ताटात जेवा, ज्यामुळे कॅलरी  इनटेक कमी होईल.

जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय

भाज्या जास्त खा

अन्नामध्ये फायबरचा अधिक समावेश करा. आपले ताट विविध भाज्यांनी भरा. भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वेही मिळतील. यासोबतच पोटही भरल्यासारखे वाटेल. आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियासाठी फायबर उत्तम आहे. जर तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील उत्तम राहेल. कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी जेवणापूर्वी सॅलड खा. ज्यामुळे जास्त भूक लागणार नाही.

जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

जेवणापूर्वी पाणी प्या

जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यासोबतच कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे आपल्याला जास्त जेवण जात नाही. त्यामुळे अन्न खाण्यापूर्वी पाणी प्या. तसेच जेवणासोबत आणि जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स