Join us  

हिवाळ्यात सुकामेवा खावा, पण किती? अतिरेक केला तर पोटाचे आजार छळतील, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2022 8:23 AM

Benefits of Eating Dry fruis: हिवाळा आला म्हणून तुम्हीही सुकामेवा किंवा सुकामेव्याचा लाडू खायला सुरुवात केली ना? पण त्याचा अतिरेक तर होत नाही ना, हे देखील एकदा तपासून पहा.

ठळक मुद्देसुकामेवा किती खावा, याचे प्रमाणही ठरलेले आहे. त्याचा अतिरेक शरीरासाठी निश्चितच हानिकारक ठरू शकतो.

हिवाळा आला की घरोघरी सुकामेव्याची विशेष खरेदी केली जाते आणि तो नियमितपणे खाल्लाही जातो. काही जण तर सुकामेवा नुसता पण खातात आणि त्याचे लाडू करूनही खातात. सुकामेवा पौष्टिक असतो, हिवाळ्यात शरीराला जी उष्णता, ऊब पाहिजे असते, त्यासाठी पुरक ठरतो. शिवाय सुकामेव्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील उर्जा टिकून राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही फायदा होतो. या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी सुकामेवा किती खावा, याचे प्रमाणही ठरलेले आहे. त्याचा अतिरेक शरीरासाठी निश्चितच हानिकारक ठरू शकतो. म्हणूनच सुकामेवा खाण्याचे प्रमाण किती असावे, याविषयी वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

 

सुकामेवा किती प्रमाणात खावा?१. याबाबत हेल्थशॉट या साईटला माहिती देताना आहारतज्ज्ञ सिमरन चोप्रा म्हणाल्या की, प्रत्येकाच्या तब्येतीनुसार आणि वयानुसार सुकामेवा किती प्रमाणात खावा, याचे प्रमाण वेगवेगळे असते. तरीही आठवडा भरातून सगळ्या प्रकारचा सुकामेवा असणाऱ्या मध्यम आकाराच्या ४ ते ५ वाट्या प्रौढ मंडळींसाठी योग्य आहेत. पण हा सुकामेवा सॉल्टेड आणि फ्लेवर्ड नसावा.

 

२. फक्त बदाम किंवा काजू किंवा नुसतेच मनुका आणि अंजीर असा एकच एक प्रकारचा सुकामेवा खाऊ नये.

शकिराच्या ‘वाका.. वाका...’ गाण्यावर माधुरी दीक्षित- ऐश्वर्या रायचा धमाल डान्स, व्हायरल व्हिडिओ

शरीराला सुकामेव्याचा पुरेपूर फायदा होण्यासाठी बदाम, काजू, मनुका, अंजीर, खजूर, पिस्ते, अक्रोड असा सगळाच प्रकारचा सुकामेवा थोडा- थोडा खावा. कारण ते सगळेच एकमेकांसाठी पुरक ठरतात.

 

३. वेगवेगळ्या सुकामेव्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतो. काही हृदयासाठी चांगले असतात, तर काहींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.

Wedding Special: हळदीच्या कार्यक्रमासाठी बघा ५ परफेक्ट लूक... दिसाल सुंदर आणि स्पेशल

काही थायरॉईडसाठी चांगले असतात तर काही इम्युनिटी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपल्या आरोग्याचे नेमके स्वरुप आणि तक्रारी कशा आहेत, यावर सुकामेवा खाण्याचे प्रमाण ठरवावे. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाअन्न