Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

weight loss diet: कोणते फॅट्स खायचे, कोणते टाळायचे, किती खायचे आणि खाल्लेले किती बर्न करायचे? असे फॅट्सबाबत (fats) वेगवेगळे प्रश्न पडले असतील, तर याविषयी तज्ज्ञांचं मत जाणून घ्या आणि तिशीनंतर आपल्या शरीराला किती फॅट्सची गरज आहे, ते ही वाचा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 04:36 PM2022-03-02T16:36:36+5:302022-03-02T16:37:41+5:30

weight loss diet: कोणते फॅट्स खायचे, कोणते टाळायचे, किती खायचे आणि खाल्लेले किती बर्न करायचे? असे फॅट्सबाबत (fats) वेगवेगळे प्रश्न पडले असतील, तर याविषयी तज्ज्ञांचं मत जाणून घ्या आणि तिशीनंतर आपल्या शरीराला किती फॅट्सची गरज आहे, ते ही वाचा.. 

How much and which type of fats intake is more important for women in her 30s to maintain weight and health | तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

Highlightsवयाप्रमाणे आपण किती फॅट्स दिवसभरातून घ्यायला हवेत हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचं डाएट प्लॅन करा.

फॅट्स जास्त झाले, फॅट्स बर्न करणे... असं आपण भरपूर ऐकतो.. त्यामुळे मग फॅट्स हे नाव ऐकताच आपल्याला भीती वाटू लागते.. पण मैत्रिणींनाे असं सरसकट सगळ्याच प्रकारच्या फॅट्सला धोकादायक ठरवून मोकळे होऊ नका. तुमच्या शरीराला काही प्रमाणात काही विशिष्ट फॅट्सची (fats intake) गरज असतेच. त्यानुसार आपल्या वयाप्रमाणे आपण किती फॅट्स दिवसभरातून घ्यायला हवेत हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचं डाएट प्लॅन करा. हैद्राबाद येथील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. संदीप रेड्डी यांनी याविषयी दिलेली ही माहिती..

 

- प्रोटीन्स आणि फॅट्स हे दोन्ही घटक मायक्रोन्युट्रियंट्स म्हणून ओळखले जातात. शरीराच्या जडणघडणीसाठी या दोन्ही घटकांची अतिशय आवश्यकता असते. तुमचं वय, प्रकृती आणि कामाचं स्वरूप यावरून या दोन्ही गोष्टींचे प्रमाण ठरवता येते.
- आपण दिवसभरातून किती कॅलरी घेतो, यावरही आपण किती फॅट्स घ्यायला हवेत, हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ जर तुम्हाला दिवसभरातून २००० कॅलरीज घ्यायला सांगितल्या तर त्यापैकी ५५ ते ७८ ग्रॅम फॅट्स आणि ५० ते १५० ग्रॅम प्रोटीन्स असणं गरजेचं असतं.


- तिशीच्या आसपास असणाऱ्या महिलांना दरदिवशी १६०० ते २२०० कॅलरीची आवश्यकता असते. यापैकी २० ते ३५ टक्के कॅलरी त्यांना फॅट्समधून मिळाल्या पाहिजेत, असे US office of disease prevention and health promotion यांच्या गाईडलाईन्सनुसार सांगण्यात आले आहे. 
- पण तरीही वय, प्रकृती, कामाचे स्वरूप, आजार, अनुवंशिकता यासगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या डाएटिशीयनकडून सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच फॅट्स इनटेकचे प्रमाण ठरवावे.

 

कोणते फॅट्स खायचे आणि कोणते टाळायचे...
- सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड (saturated, unsaturated and monounsaturated) हे फॅट्सचे मुख्य प्रकार आहेत. यापेकी तिशीनंतर सॅच्युरेटेड फॅट्स खाणे कमी केले पाहिजे. लोणी, नारळाचं तेल, आईस्क्रिम, पनीर यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. हे पदार्थ खाणे कमी करावे. हे पदार्थ अति खाल्ल्यास शरीरातील वाईट कोलेस्टरॉलमध्ये वाढ होते.
- सुर्यफूल, सोयाबीन तेल हे अनसॅच्युरेडेट फॅट्स प्रकारात येतात.
- बदाम, अक्रोड हे दोन पदार्थ मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे उत्तम उदाहरण मानले जातात. 

 

Web Title: How much and which type of fats intake is more important for women in her 30s to maintain weight and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.