Join us  

रोज चालायला जाऊनही पोट कमी होत नाही? ५ वाॉकिंग रुल्स, पटापट बारीक व्हाल-स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 1:27 PM

How much daily walk is necessary to lose 7 to 8 kg : महिन्याभरात ७ ते ८ किलोंपेक्षा जास्त वजन कमी करायचं असेल तर किती चालायला हवं, काय खायंच काय टाळायचं हे समजून घेऊया.

वजन कमी करणं एखाद्या मोठ्या चॅलेंन्जपेक्षा कमी नसतं. काहीलोक भरपूर मेहनत करून वजन कमी करतात तर काहीजणांचं फार कमी वेळात वजन कमी होतं. (Rule of walking for weight loss)अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रोज किती चालायला हवं असा प्रश्न अनेकांना पडतो. जर महिन्याभरात ७ ते ८ किलोंपेक्षा जास्त वजन कमी करायचं असेल तर किती चालायला हवं, काय खायंच काय टाळायचं हे समजून घेऊया. (How much daily walk is necessary to lose 7 to 8 kg)

१०० कॅलरीज बर्न करण्ययासाठी २ किलोमीटर वॉक 

1) वजन कमी करण्यासाठी  किती किलोमीटर चालायलचं याची फुलप्रुव्ह पद्धत नाही. पण लोकांना चालण्यााने वजन कमी करण्याबाबत बरेच अनुभव आले आहेत. अमेरिकन हार्ट एसोशियेशनुसार  १.६ किलोमीटर चालल्यानं ५५ ते १४० कॅलरीज बर्न होतात. तुम्ही किती चालता या स्पिडवर ते अवलंबून असते.

2) ब्रिटिश नॅशनल हेल्श सर्विसनुसार रोज कमीत कमी १५० मिनिटं मॉडरेट वॉक केल्यानं तुम्ही बरेचं वजन कमी करू शकता.  रोज १० हजार पाऊलं चालण्याचा सल्ला दिला जातो. रोज किती चालल्यानं वजन कमी होतं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. १० किलो वजन कमी  करण्यासाठी २ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागतो.

3) तज्ज्ञांच्यामते वजन कमी करण्यासाठी ब्रिस्क वॉक करण्याचा सल्ला दिला जातो. ब्रिस्क एक्सरसाइज म्हणजे जेव्हा तुम्ही वॉक करता तेव्हा स्पीड कमीत कमी ६ किलोमीटर प्रती तास असायला हवी.  जर कोणतीही व्यक्ती यापेक्षा जास्त वेगानं रनिंग करत असेल तर वेगानं वजन कमी होण्यास मदत होईल. 

4) फक्त वॉकच नाही तर आहारावरही नियंत्रण ठेवायला हवं. आहारात अन्हेल्दी पदार्थ न खाता हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. योग्य प्रमाणात झोप आणि तणावमुक्त जीवन वजन कमी करण्यासाठी गरजेचं आहे.

5) सकाळी चालाल्यानं तुम्हाला जास्त फायदे मिळतील पण वेळेअभावी सकाळी चालू शकत नसाल तर रात्री चाला पण रोज १० हजार पाऊल चालणं होईलच असे पाहा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स