Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मीठ जास्त खाणं जीवघेणं! राेज किती मीठ खाणं तब्येतीसाठी आवश्यक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

मीठ जास्त खाणं जीवघेणं! राेज किती मीठ खाणं तब्येतीसाठी आवश्यक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

Need of Salt Per Person Per Day: तुमच्याही जेवणात मीठ जास्त होत नाही ना, हे एकदा तपासून बघण्याची गरज आहे.. कारण मिठाचा जास्त (intake of salt) वापर अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 06:53 PM2022-07-14T18:53:01+5:302022-07-14T18:53:38+5:30

Need of Salt Per Person Per Day: तुमच्याही जेवणात मीठ जास्त होत नाही ना, हे एकदा तपासून बघण्याची गरज आहे.. कारण मिठाचा जास्त (intake of salt) वापर अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतोय...

How much salt is sufficient for per person per day? What should be the amount of salt in regular diet? | मीठ जास्त खाणं जीवघेणं! राेज किती मीठ खाणं तब्येतीसाठी आवश्यक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

मीठ जास्त खाणं जीवघेणं! राेज किती मीठ खाणं तब्येतीसाठी आवश्यक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

Highlightsजेवणाची चव सांभाळण्याआधी स्वत:चं आणि कुटूंबाचं आरोग्य सांभाळा, असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत.

तेलाचा अतिवापर (excess use of salt) करताना जसे आपण घाबरून असतो, तसाच मिठाचाही जपून वापर करायला हवा. पण का कोण जाणे तेल, मीठ या गोष्टी भरपूर असल्याशिवाय जेवणाला चवच येत नाही, असा काही जणींचा समज असतो. पण अशा पद्धतीने जेवणात चव आणायच्या नादात स्वत:च्या आणि कुटूंबाच्या आरोग्याची पार वाट लागून जाते, हेच अनेकींच्या लक्षात येत नाही. म्हणूनच जेवणाची चव सांभाळण्याआधी  स्वत:चं आणि कुटूंबाचं आरोग्य सांभाळा, असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. त्यासाठीच दररोज कुणाला किती मीठ पुरेसं आहे (How much salt is sufficient for per person per day?), याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती. 

 

मिठाचा अतिवापर केल्याने आरोग्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, याविषयी ब्रिटनमध्ये (Study about salt intake) नुकताच एक अभ्यास करण्यात आला. तब्बल ५ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, अन्नामध्ये अतिरिक्त मीठ टाकल्याने अकाली मृत्यूचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो. अमेरिकन आरोग्यतज्ज्ञ लू यांनी असा दावा केला आहे की जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर असून मीठ घालणे टाळले तर अधिककाळ जगू शकाल. पॅक फूडमधून पोटात जाणाऱ्या मिठामुळे तब्येतीस सर्वाधिक धोका आहे, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

 

मीठ जास्त खाल्ल्याने तब्येतीवर होणारे परिणाम (Side effects of excess salt)
- याविषयी अधिक माहिती देताना औरंगाबाद येथील आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक म्हणाल्या की, जास्त मिठामुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं
- सोडियमचं प्रमाण वाढल्याने रक्तावाहिन्यांतून जे रक्त वाहत असतं, त्यावर प्रेशर येतं. याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो.  - - तसेच रक्तवाहिन्यांवर आलेल्या दाबामुळे रक्तदाबदेखील वाढतो. त्याचा परिणाम किडनीवरही होतो. 

वजन वाढण्याची भीती वाटतेय? रात्रीचं जेवण करताना लक्षात ठेवा 4 टिप्स, रहाल नेहमीच फिट!
- सोडियममुळे शरीरातील कॅल्शियमवर परिणाम होतो. आणि या दोन्हींचा परिणाम मेंदूशी निगडीत स्ट्रोक येण्यावर होतो.
- हार्मोन्सचे असंतुलन, किडनीस्टोन असा त्रासही मीठ जास्त खाल्ल्याने होतो. 

 

दररोज किती मीठ पुरेसं
याविषयी सांगताना डॉ. कर्णिक म्हणाल्या की एका व्यक्तीला एका दिवसासाठी २ ग्रॅम किंवा त्याहूनही कमी मीठ पुरेसं आहे. रोजच्या स्वयंपाकात २ ग्रॅम मीठ वापरत असाल पण खारवलेले पदार्थ, बेकरी, ड्राय फिश, पॅक फूड असे बाहेरचे अनेक पदार्थ नेहमीच खात असाल, तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण या अशा पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते.

चहा पिताना त्यासोबत तुम्ही काय खाता? कधीच खाऊ नका ५ गोष्टी; आजारांना घरबसल्या आमंत्रण 

पालेभाज्यांमध्ये निसर्गत:च क्षार असतातच. त्यामुळे मीठ न घालता त्या तशाच वाफवून खाल्ल्या तर अधिक चांगलं. शरीरात मिठाचं प्रमाण वाढल्यास शरीरावर सूज येते, पायावर सूज येते, पुरुषांमध्ये मीठ वाढल्यास युरिक ॲसिड शरीराबाहेर पडत नाही. 
महिलांमध्ये जाणवणारं लक्षण म्हणजे बोटाने दाबल्यावर खड्डा पडत असेल, तर मिठाचं प्रमाण तात्काळ कमी करावं.

 

Web Title: How much salt is sufficient for per person per day? What should be the amount of salt in regular diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.