Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

How Much Should You Walk every Day According To Your Age : रोज जवळपास ४ ते ५ किलोमीटर चालणं उत्तम ठरतं.  जर तुम्ही वयस्कर असाल तर ३ ते ४ किलोमीटर रोज चाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:36 PM2024-09-22T12:36:04+5:302024-09-22T17:24:52+5:30

How Much Should You Walk every Day According To Your Age : रोज जवळपास ४ ते ५ किलोमीटर चालणं उत्तम ठरतं.  जर तुम्ही वयस्कर असाल तर ३ ते ४ किलोमीटर रोज चाला.

How Much Should You Walk every Day According To Your Age Find Out What Is The Right Way To Walk According to Age | रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

पायी चालणं (Walking) हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही आपल्या रूटीनमध्ये चालण्याचा व्यायामाचा समावेश करू शकता.  ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतील. वयानुसार किती चालायला हवं ते समजून घेऊ. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एंड प्रिव्हेंशनच्या रिपोर्टनुसार प्रत्येक व्यक्तीनं रोज ८ किलोमीटर चायला हवं. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार  तरूण लोकांनी कमीत कमी १५० मिनिटं कमी  इंटेसिटी व्यायाम करायला हवा याचा अर्थ असा की रोज ३० मिनिटं वेगानं चालायला हवं. (How Much Should You Walk every Day According To Your Age Find Out What Is The Right Way To Walk According to Age)

साईंटिफिक अमेरिकन. कॉमच्या रिपोर्टनुसार ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी आयुर्मान आणि हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याच्या दृष्टीनं सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी रोज ८ हजार ते १० हजार पाऊलं चालणं आवश्यक आहे.  ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी ६ हजार ते ८ हजार पाऊलं रोज चालायला हवं.हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि ब्रिघम बोस्टनमधील महिला रुग्णालयातील एपिडेमियोलॉजिस्ट आय मिन ली म्हणतात की एक आकर्षक वाक्य आहे की, दररोज अनेक पाऊलं चालणं लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतं परंतू ते अशक्य नाही. जर तुम्ही दिवसाला १० हजार पाऊल चालण्याचा विचार केला तर हे एक चांगले ध्येय आहे. 

रोज जवळपास ४ ते ५ किलोमीटर चालणं उत्तम ठरतं.  जर तुम्ही वयस्कर असाल तर ३ ते ४ किलोमीटर रोज चाला. चालण्याचं प्रमाण तुम्ही रोज थोडं थोडं वाढवू शकता. ज्यामुळे मूड आणि हेल्थ दोन्ही चांगले राहण्यास मदत होते. ६ ते १७ वर्ष वयोगटात दिवसभरात कमीत कमी ६० मिनिटं व्यायाम करायला किंवा खेळायला हवं, मुलांनी दिवसभरात ३ ते ४ किलोमीटर चालावं.

३० ते ४५ मिनिटांचा वेळ उत्तम ठरतो. रोज चालण्याचा व्यायाम केल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ज्यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि उर्जा मिळते. त्वचा लवचीक होण्यास मदत होते.

Web Title: How Much Should You Walk every Day According To Your Age Find Out What Is The Right Way To Walk According to Age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.