Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल

बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल

How Much Water Should You Drink : जेव्हा जास्त प्रमाणात पाणी प्यायले जात नाही तेव्हा शरीर संकेत देते की भूक लागते. तेव्हा वास्तविक भूक लागलेलीच नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:53 PM2024-01-09T18:53:14+5:302024-01-09T20:12:23+5:30

How Much Water Should You Drink : जेव्हा जास्त प्रमाणात पाणी प्यायले जात नाही तेव्हा शरीर संकेत देते की भूक लागते. तेव्हा वास्तविक भूक लागलेलीच नसते.

How Much Water Should You Drink : How Much Water Should You Drink Per Day | बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल

बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल

वाढत्या वजनाची समस्या आजकाल प्रत्येकालच सतावते लोक आपलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांच्या शोधात असतात. पण अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही. (Water For Weight Loss) खूप कमी लोकांना हे माहीत आहे की पाणी प्यायल्याने फक्त तहान भागत नाही तर वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. बॉडी टेम्परेचर ते डायजेशन, मेटाबॉलिझ्म चांगले राहते. हे पाणी वजन कमी करण्यासही सहाय्यक ठरू शकते. 
जास्त भूक लागत नाही. (How Much Water Should You Drink Per Day)

जेव्हा जास्त प्रमाणात पाणी प्यायले जात नाही तेव्हा शरीर संकेत देते की भूक लागते. तेव्हा वास्तविक भूक लागलेलीच नसते. अशावेळी लोक जास्त खातात. म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास ओव्हरइटींग टाळता येतं. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं आणि ओव्हर इटींग करत नाही.  ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.

वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवे?  (How Much Water To Drink a Day)

हार्वर्डच्या रिपोर्टनुसार  चांगल्या आरोग्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ज्यूस, कॉफी, चहासुद्धा घेऊ शकता. पाणी कमी प्यायल्यास डिहायड्रेशनचा धोका असतो. डार्क रंगाची युरीन, थकवा, ब्लड प्रेशर लो होणं, डिजीनेस उद्भवतो. प्रत्येकाचे पाणी पिण्याचे वेगवेगळे असू शकते. अनेकांना पाणी पिण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. 

टॉक्सिन्स बाहेर पडतात

पाणी शरीरातीतून टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. पाण्यामुळे शरीर नॅच्युरली डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. युरिनच्या माध्यमातून टॉक्सिन्स बाहेर पाडतात. ज्यामुळे ओव्हरऑल हेल्थवरही चांगला परिणाम होतो आणि वजन कमी होते.

दूध आवडत नाही पण कॅल्शियमच काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

कॅलरी फ्री

तहान लागल्यानंतर हाय कॅलरीज ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स पिण अनेकांची पसंती असते.  या जास्तप्रमाणात साखर आणि कॅलरीज इन्टेक असते. ज्यामुळे वजन कमी होऊ शकत नाही. पण पाणी एक कॅलरी फ्री डिंक आहे. ज्याच्या सेवनाने संतुष्टी मिळते आणि एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. ज्यामळे वेट लॉस करणं सोपं होतं.

मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. तसंच शरीर हायड्रेट राहते. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळ  कॅलरीज कमी होतात. अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे की पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढून वजन कमी होते. 

Web Title: How Much Water Should You Drink : How Much Water Should You Drink Per Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.