सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे बाजारातून फेरफटका मारल्यानंतर पांढरेशुभ्र मुळे भाज्यांच्या गाडीवर अतिशय आकर्षकपणे रचून ठेवलेले दिसतात. एरवी ते मिळत नाहीत. त्यामुळे ते घेण्याचा आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाण्याचा मोह होतोच. आपण खाताना तर मोठ्या उत्साहात मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून खातो. पण नंतर मात्र त्याचा त्रास होतो. काही जणांची ॲसिडीटी वाढते तर काही जणांना गॅसेस होतात (best way to eat mooli or radish). त्यामुळेच मुळा खाऊन असे काही त्रास हाेऊ नयेत आणि मुळ्याचा छानपैकी आस्वाद घेता यावा यासाठी मुळ्याचा कोणताही पदार्थ खाताना थोडी काळजी घ्या आणि पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा...(How to avoid bloating and gases after eating mooli?)
मुळा खाल्ल्यानंतर अपचन, गॅसेस असा त्रास होऊ नये म्हणून...
१. याविषयी आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी सांगितलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे.
फुग्यासारखी फुलेल इडली! पीठ आंबविण्यासाठी फक्त ३ गोष्टी करा- मऊसूत, स्पाँजी इडली तयार..
यामध्ये त्या सांगतात की जर तुम्ही कच्चा मुळा खाणार असाल किंवा त्याचं रायतं करणार असाल तर खाण्यापुर्वी काही मिनिटांसाठी तो पाण्यामध्ये भिजत ठेवा. असं केल्यामुळे त्याच्यातले गॅसेस निर्माण करणारे घटक बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे मग गॅसेस, पोट फुगल्यासारखे वाटणे असे त्रास होत नाहीत.
२. मुळ्याचा पराठा करून खाणार असाल तर त्या पराठ्यांमध्ये ओवा, बडिशेप, मिरेपूड, जीरे, काळं मीठ असे पचनासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ आवर्जून टाका. त्यामुळे मुळ्याचा त्रास हाेणार नाही. शिवाय मुळ्याचा पराठा दह्यासोबत खा. दही हे प्रोबायोटीक असल्याने ते पचनासाठी नक्कीच मदत करते.
Top 5 Cake: बघा भारतीयांना सगळ्यात जास्त कोणता केक आवडतो? सांगा तुमच्या आवडीचा कोणता
३. उपाशीपोटी तसेच रात्रीच्या जेवणात मुळ्यााचे पदार्थ खाणे टाळावे. मुळ्याचे पदार्थ दुपारच्या जेवणात घेणे कधीही अधिक चांगले. मुळा खाल्ल्यानंतर काही वेळ शरीराची हालचाल होणे किंवा चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे. तरच तो पचायला सोपा जातो.