Join us  

रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 1:17 PM

How To Avoid Midnight Cravings: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ पर्यंत करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण एवढ्या लवकर जेवलं तर मध्यरात्री अनेक जणांना भूक लागते.. (what to eat if you feel hungry in midnight)

ठळक मुद्देरात्रीचं जेवण जर ७ वाजेपर्यंत घेतलं तर मध्यरात्री खूप भूक लागते. भुकेमुळे मग शांत झोपही येत नाही

हल्ली तब्येतीच्या बऱ्याच समस्या वाढत चालल्या आहेत. कमी वयातच अनेकांना बीपी, हृदयरोग, मधुमेह असे त्रास होत आहेत. शिवाय वजन वाढीची समस्याही बहुतांश लोकांमध्ये आहेच. हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावं, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षयकुमार यांच्यासारखे सेलिब्रिटीही रात्रीचं जेवण ६ ते ७ च्या दरम्यान घेतात. पण बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की रात्रीचं जेवण जर ७ वाजेपर्यंत घेतलं तर मध्यरात्री खूप भूक लागते (how to avoid midnight cravings?). भुकेमुळे मग शांत झोपही येत नाही (what to eat during midnight cravings?). अशावेळी काय करावं ते पाहा... (what to eat if you feel hungry in midnight)

 

रात्री उशिरा भूक लागल्यास काय खावे?

रात्री तुम्ही जे काही जेवण कराल ते व्यवस्थित प्रमाणात घेतले तर रात्री उशिरा भूक लागण्यचा त्रास होणार नाही, असे आहारतज्ज्ञ सुचेता पाठक सांगतात. थोडीशीच भूक लागली असेल तर पाणी पिऊनही ती भागवू शकता.

बाथरुमच्या टाईल्सचे पिवळट डाग निघता निघेना? 'ही' वस्तू वापरून १० मिनिटांत करा चकाचक

पण उशिरा असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत जे पचायला जड असतात. त्यामुळे जंकफूड, बिस्किटे, ५ मिनिटांत तयार होणाऱ्या नूडल्स, ब्रेड असं काहीही रात्री खाऊ नका. कोल्ड्रिंक किंवा विकत मिळणारी फळांची सरबते पिऊ नये. 

 

त्याऐवजी घरी तयार केलेला मुरमुऱ्यांचा, पोह्यांचा चिवडा तुम्ही खाऊ शकता. घरात नेहमीच भाजलेले मखाना असू द्या. मध्यरात्री लागलेली थोडीशी भूक भागविण्यासाठी ते उत्तम आहे.

रोज प्या 'हे' जादुई पाणी! चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की फेशियल, ब्लीच करावंच लागणार नाही

याशिवाय तुम्ही राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाण्याची चिक्की असं काही खाऊ शकता. मध्यरात्री लागलेली भूक भागविण्यासाठी सुकामेवा खाणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकाराच्या लाह्या खाणेही चांगले आहे. हे पदार्थ खाल्ल्यास वजनही वाढत नाही आणि तब्येतीला दुसरा कोणता त्रासही होत नाही.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्स