सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश करतो आणि सगळ्यात आधी चहाचं आधन ठेवतो. बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अनेक जण तर बेड टी घेणेही पसंत करतात. सकाळी सकाळी चहा-कॉफी घेतली तर तरतरी येते, आळस जातो आणि जाग यायला मदत होते असा आपला समज असतो. थंडीच्या दिवसांत तर हुडहुडी भरलेली असताना गरम चहा-कॉफी घ्यायला छान वाटते. एकदा चहा घेतला की मग फ्रेश वाटते आणि पुढची कामं पटापट होतात असंही अनेक जण म्हणतात. सकाळी चहा किंवा कॉफी घेतल्याशिवायही आपल्याला एनर्जेटीक वाटू शकते (How To Avoid Tea and Coffee In Morning).
चहामध्ये असणाऱ्या साखरेमुळे आपल्याला काही प्रमाणात एनर्जी आल्यासारखे वाटते. तसेच चहा गरम असल्याने तो प्यायल्यावर तरतरी आल्याचा फिल येतो. पण सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेणं आरोग्यासाठी चांगलं नसतं असं आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे चहा - कॉफी न घेताही आपल्याला फ्रेश वाटू शकतं. मग याऐवजी सकाळी उठल्यावर काय घ्यायचं याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पूजा भार्गव काही महत्त्वाच्या टिप्स देतात. चहा आणि कॉफीला पर्याय असणारे एक पेय आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे त्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगतात...
चहा-कॉफीला उत्तम पर्याय असलेले पेय कसे करायचे?
रात्री झोपताना २ ते ३ केशराच्या काड्या आणि ४ ते ५ काळे मनुके एक कप पाण्यात भिजवावेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
फायदे
१. सकाळी उठल्यावर हे प्यायल्याने फ्रेश वाटेल आणि दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल.
२. हार्मोनल बॅलन्स राखला जाऊन ताण निघून जाण्यास याचा चांगला फायदा होईल.
३. मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी आणि क्रॅम्प कमी व्हायला उपयुक्त.
४. त्वचा चमकदार दिसण्यास आणि पिंपल्सपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
५. झोपेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि वजन कमी करायचे असल्यासही या पेयाचा फायदा होतो.