Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम...

आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम...

How to avoid weekend weight gain : 5 ways to avoid weekend weight gain : Weekend Weight Gain Is Real, Here Are 5 Tips To Avoid It: काही गोष्टींची काळजी घेतल्यास विकेंडला देखील नियम पाळून आपण आपले वजन कमी करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 07:33 PM2024-08-24T19:33:13+5:302024-08-24T19:42:03+5:30

How to avoid weekend weight gain : 5 ways to avoid weekend weight gain : Weekend Weight Gain Is Real, Here Are 5 Tips To Avoid It: काही गोष्टींची काळजी घेतल्यास विकेंडला देखील नियम पाळून आपण आपले वजन कमी करु शकतो.

How to avoid weekend weight gain Avoid Weekend Weight Gain 5 ways to avoid weekend weight gain | आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम...

आठवडाभर डाएट फॉलो करुन विकेंडला दुप्पट खाताय ? वजन कमी करण्यासाठी विकेंडला पाळा हे ५ नियम...

विकेंड म्हटलं की आपल्याला आठवते ती मजा, मस्ती. आठवडाभर घड्याळ्याच्या काट्यानुसार धावणारे आपण विकेंडला थोडे रिलॅक्स होतो. विकेंड हा प्रत्येकाच्या हक्काचा आरामाचा दिवस असतो. या दिवशी रोजच्या कामाला सुट्टी देऊन आपण स्वतःला हवे तसे मोकळे वावरतो. आठवडाभर स्वतःला घालून घेतलेली बंधने आपण शक्यतो विकेंडला विसरतो. असेच आपण डाएट (Avoid Weekend Weight Gain) आणि एक्सरसाइजच्या बाबतीत देखील करतो. वजन कमी करण्यासाठी आपण आठवडाभर डाएट अगदी व्यवस्थित फॉलो करतो, एक्सरसाइज करतो. परंतु विकेंड आला की आपण या सगळ्या गोष्टी फॉलो करण्यात आळस करतो. विकेंड आल्यावर आपण डाएट आणि इतर सगळ्याच गोष्टी फॉलो न करता, अरबट - चरबट काहीही खातो. यामुळे आठवडाभर आपण पाळलेल्या डाएट आणि मेहेनतीवर पाणी फेरले जाते. विकेंडला आपण शक्यतो फॅमेली किंवा मित्रमैत्रिणींसोबत काही प्लॅन्स करतो आणि पार्टी किंवा आऊटिंग करुन बाहेरचे चमचमीत, तेलकट पदार्थांवर ताव मारतो. विकेंडची ही एक वाईट सवय आपले वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते(Tips to Avoid Weight Gain During the Weekend).

आठवडाभर व्यायामाचं, आहाराचं रुटीन पाळून कंटाळा आलेला असतो त्यामुळे विकेंडला सरळ सर्व नियम गुंडाळून मजा करण्यावर भर असतो. अशा परिस्थितीत आपले डाएट पूर्णपणे बिघडू शकते. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास विकेंडला देखील नियम पाळून आपण आपले वजन कमी करु शकतो.  याबाबत माहिती देताना स्पोर्ट्स आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट नताशा कानडे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याबद्दल अधिक माहिती  घेऊयात (Weekend Weight Gain Is Real, Here Are 5 Tips To Avoid It).

विकेंडला वजन कमी करण्यासाठी... 

१. जास्तीत जास्त भाज्या खा :- आपण आपल्या विकेंडच्या दिवसाची सुरुवात अनेकदा बाहेरून आणलेले अनहेल्दी पदार्थ खाऊन करतो. या सवयीने नकळतपणे वजन जलद गतीने वाढले जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात भाज्या, सॅलॅड, सूप पिऊन करा. यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या आणि सूप पिऊ  शकता. यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळेल आणि दिवसभर तुम्ही हायड्रेटेड राहाल.    

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

 

२. जेवणात हेल्दी पदार्थ खा :-  विकेंडला बाहेरचे जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हेल्दी खाण्यावर अधिक भर द्यावा. विकेंडला आपण शक्यतो बाहेरचे चमचमीत पदार्थ खातो यामुळे वजन वाढते यासाठीच असे अनहेल्दी पदार्थ खाणे टाळा. याउलट घरी तयार केलेले हेल्दी पदार्थ खा. बाहेरचे अन्नपदार्थ सतत खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते. 

३. साखर खाणे टाळा :- विकेंडला आपण वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ किंवा कोल्ड्रिंक्स भरपूर प्रमाणात पितो. गोड पदार्थांमधील साखरेमुळे आपले वजन वाढू शकते. यामुळे विकेंडला साखरेचे पदार्थ खाणे टाळा. याचबरोबर जर का गोड खाण्याची इच्छा झालीच तर आपण हेल्दी गोड पदार्थ जसे की, चिया पुडिंग,   फळे आणि लो कॅलरीज किंवा शुगर फ्री मिठाई खाऊ शकता. 

सकाळी उठल्याउठल्या पांघरुणावर बसूनच करा ५ स्ट्रेचिंग- दिवसभर कितीही काम करा-एनर्जी जबरदस्त...

४. जास्त खाऊ नका :- आपल्या वजन कमी करण्याच्या या रुटीनमध्ये आपल्याला खाण्यावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. विकेंडला आपण बहुतेकवेळा गरजेपेक्षा जास्त खातो, यामुळे आपल्या पचनसंस्थेचे नुकसान तर होते पण वजनही वाढू शकते. त्यामुळे विकेंडला आपल्या आरोग्याची  विशेष काळजी घ्या. 

५. प्रोटीनयुक्त पदार्थ खा :- विकेंडला शक्यतो प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हेवी पदार्थ खाण्यापेक्षा प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा. हे वजन कमी करण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यासाठी देखील मदत करते.


Web Title: How to avoid weekend weight gain Avoid Weekend Weight Gain 5 ways to avoid weekend weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.