Join us  

दिवाळी वजन वाढू नये म्हणून 'हे' काम करा; तळलेले, गोड पदार्थ खाऊन कणभर वजन वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:05 PM

How To Avoid Weight Gain In Diwali : पोटभर फराळाचं खायचं आणि त्यानंतर जेवण सुद्धा करायचं हे दोन्ही जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो.

दिवाळी (Diwali 2024) म्हणलं की गोड आणि फराळाचे पदार्थ खाणं आलंच त्यामध्ये जास्तीत फराळाचे पदार्थ हे तळलेले असतात आणि हे सगळे पदार्थ मनसोक्त खाल्ल्याशिवाय समाधान सुद्धा मिळत नाही.  फराळाचे पदार्थ अगदी दिवाळी संपल्यानंतरही वारंवार खाल्ले जातात. परंतु त्या पाठोपाठ येते ती ऍसिडिटी खूप सुस्ती आणि वाढलेले वजन. (How To Avoid Weight Gain In Diwali)

सातत्याने व्यायाम आणि चांगला आहार घेणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स खूप कमी येतात परंतु वर्षभर काहीच करायचं नाही आणि दिवाळीमध्ये सुद्धा वाटेल तसे खाण्यामुळे पचनाचे त्रास सुरू होऊ शकतात. ज्यामुळे फक्त पचनक्रियेवरच परिणाम होत नाही तर वजनातही बदल दिसून येतो. वजनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पोषणतज्ज्ञ आणि वेट लॉस मॅनेजमेंट अडव्हायजर  मंजिरी कुलकर्णी (Manjiri Kulkarni) यांनी दिवाळीत वजन वाढू नये यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

आता यावर उपाय काय तर. सगळ्यात आधी शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार आवश्यक आहे म्हणजेच पाणी दिवाळीच्या काळामध्ये जास्त प्यायला हवं. किंवा लिक्विड पदार्थांचे सेवन जास्तीत जास्त करायला हवं यामध्ये तुम्ही ताक लिंबू पाणी हे जास्त प्रमाणात घेऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता. 

फक्त १५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली; ना तेलकट-ना किचकट करा झटपट चकली

 फराळाच्या किंवा तेलकट पदार्थांवर नियंत्रण कसा मिळवायचं?

यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे पोर्शन कंट्रोल जर केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही फराळ ताटात वाढून घेता तेव्हा त्याचं प्रमाण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. खूप पोटभर फराळाचं खायचं आणि त्यानंतर जेवण सुद्धा करायचं हे दोन्ही जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. 

त्याचबरोबर अजून एक टीप आहे ती म्हणजे आता मार्केटमध्ये आवळे मिळत आहेत तर तुम्ही दिवाळीच्या काळामध्ये रोज एक आवळा खाल्लात तर तुमची ऍसिडिटी नियंत्रणात राहण्यासाठी याची खूप मदत होऊ शकते.  त्यामुळे भरपूर पाणी पिणे, ताक पिणे, लिंबू पाणी पिणे आणि दररोज एक आवळा खाणे हे जर केलेत तर तुम्हाला दिवाळीमध्ये त्रास होणार नाही.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यदिवाळी 2024वेट लॉस टिप्स