Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण..

दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण..

How To Stop Overeating On Weekends : आठवडाभर शिस्तीत जगण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण ‘विकेंड’ला चुकतात आणि फसतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 02:16 PM2023-03-17T14:16:05+5:302023-03-17T14:30:50+5:30

How To Stop Overeating On Weekends : आठवडाभर शिस्तीत जगण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण ‘विकेंड’ला चुकतात आणि फसतात..

How To Balance Diet While Eating Out On Weekends | दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण..

दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण..

आठवड्याभराच्या कामामुळे येणारा थकवा घालविण्यासाठी आपण सगळेच विकेंडची खूप आतुरतेने वाट पहात असतो. रोजच्या कामाच्या दगदगीत आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी रिलॅक्स होऊन मूड रिफ्रेश करण्यासाठी आपल्याला एका छानश्या विकेंडची गरज असतेच. आराम करायचा असल्यास, फॅमेलीसोबत वेळ घालवायचा असल्यास, एखादा सिनेमा पहायचा म्हटलं की या साऱ्या गोष्टी आपण विकेंडला प्लॅन करतो. रोजच्या रुटीनपेक्षा विकेंडला आपण काहीतरी वेगळ करावं असं मनोमन ठरवतो. यासाठी आपण आपल्या प्रियजनांसोबत बाहेर जेवायला जातो, मज्जा, मस्ती करत आपण आपला विकेंड छान घालवतो. 

विकेंड चांगला जावा यासाठी मज्जा, मस्ती करतांना आपण बऱ्याचदा बाहेरचे अनहेल्दी फूड खातो. काहीवेळा ही अनहेल्दी फूड खाण्याची सवय 'ओव्हरइटिंग' मध्ये बदलते. रोजच्या रुटीनमध्ये आपण आपले डाएट, एक्सरसाइज यांसारख्या सगळ्या गोष्टी अतिशय काटेकोररीत्या पाळतो. परंतु विकेंड येताच रोजच्या रुटीनचा थकवा घालविण्यासाठी आपण विकेंड एन्जॉय तर करतो, परंतु एन्जॉय करताकरता आपण बाहेरचे अनहेल्दी फूड खाण्यावर जास्त भर देतो. असे केल्याने आठवडाभर मेहनत करुन जे डाएट, एक्सरसाइज आपण करतो त्या मेहेनतीवर पाणी फेरले जाते. असे होऊ नये याकरिता काही महत्वाच्या टिप्स समजून घेऊयात जेणेकरून डाएट, एक्सरसाइज यांसारख्या गोष्टींची खबरदारी घेऊन आपला विकेंड चांगला जाईल(How To Balance Diet While Eating Out On Weekends).

नक्की काय करता येऊ शकत? 

१. वर्कआऊट चुकवू नका :- विकेंड म्हटल्यावर सगळेच भरपूर उशिरा पर्यंत अंथरुणांत झोपून राहणे पसंत करतात. दररोजच्या कामाच्या दगदगीत आपली झोप पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत विकेंडला झोप पूर्ण करणे ही एक सहाजिक गोष्ट आहे. परंतु असे न करता किमान थोडा वेळ तरी आपण एक्सरसाइज केलाच पाहिजे. आपल्या शरीराची थोडी हालचाल करणे आणि थोडा व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आठवड्याभरातील बाकीच्या दिवशी कामाचा ताण आणि एक्सरसाइज करण्यासाठी वेळेची कमी या कारणांमुळे आपल्याला वर्कआऊट नीट करता येत नाही. यासाठी विकेंडच्या सुरुवातीलाच ३० ते ४० मिनिटे नक्की एक्सरसाइज करावा. आपल्या आवडीची कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी जसे की, धावणे, चालणे, झुंबा, पोहणे किंवा कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू शकता. विकेंडला तुम्ही जे काही खात असाल त्याचे तुमच्या वर्कआऊटमुळे योग्य संतुलन साधू शकता.

२. हेल्दी खाण्यासाठी प्लॅनिंग करा :- विकेंड दरम्यान जर आपण घरचे अन्नपदार्थ खाण्याचा पर्याय निवडला तर आपण 'ओव्हरइटिंगच्या' समस्येपासून दूर राहू शकता. विकेंडला दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरीच करण्याचा उत्तम पर्याय आपण निवडू शकता यामुळे आपली बाहेर खाण्याची शक्यता कमी होईल. यामुळे बाहेरचे अनहेल्दी, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यापासून आपण स्वतःला लांब ठेवू शकता. प्रत्येक ऋतूंनुसार उपलब्ध असणाऱ्या भाज्यांमध्ये सॉस आणि चवदार टॉपिंग्ज मिसळून तुम्ही हेल्दी सॅलेड बनवू शकता.

३. चिट मिल खाणे कमी करा :- बहुदा बरेच लोक विकेंडला चिट मिल खाण्याचे प्लॅनिंग करतात. आपल्या रोजच्या रुटीनमधील डाएट चार्टपासून थोडे दूर जाऊन आपल्या आवडीचे पदार्थ खाणे सगळ्यांनाच आवडते. परंतु असे केल्याने आपल्या शरीरातील अन्नचक्र गंभीरपणे विस्कळीत होते. अशा परिस्थिती विकेंडच्या संपूर्ण दिवसभरात चिट मिल खाण्यापेक्षा दिवसभरातील एक वेळचे जेवण आपल्या पसंतीनुसार करावे. यामुळे आपले चिट मिल देखील खाऊन होईल व डाएट सुद्धा पाळले जाईल. दुपारच्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या चिट मिल सोबत थोडे हेव्ही खाऊ शकता आणि उर्वरित दिवसभर हेल्दी होममेड खाऊ शकता. 

४. कमी खा :- विकेंडला आपण काय खातो, किती खातो, कसे खातो या कडे लक्ष ठेवणे हाच खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. बहुतेक लोकांचा असा गैरसमज असतो की, विकेंडची एकच रात्र असते आणि आपण आपल्या आवडीच्या सर्व गोष्टी खाऊ शकतो. पण अशावेळी आपल्या आवडीच्या  सर्वच गोष्टी खाण्याऐवजी काही निवडकच आवडीच्या गोष्टी खाव्यात.

 

Web Title: How To Balance Diet While Eating Out On Weekends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.