आजकाल कोणत्याही पदार्थात भेसळ करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.. पदार्थांमध्ये भेसळ करायची आणि ते अव्वाच्या सव्वा किमतीला विकायचे हा बाजाराचा जणू नियम झाला आहे. दूध, खवा यांच्यामधली भेसळ तर सणासुदीच्या काळात किती वाढलेली असते, हे वेगळे सांगायलाच नकाे. चहा पावडर, तांदूळ, रवा, पनीर अशा पदार्थांमधली भेसळही (adulterated ghee) वारंवार शोधून काढलीच जाते... या पदार्थांप्रमाणचे तुपातही सर्रास भेसळ (How to check the purity of ghee at home) केली जाते.
आजकाल घरी तूप करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. किंवा मग घरी केलेलं तूप पुरत नाही, त्यामुळे बाजारातून विकतचं तूप दर महिन्याला घरी येतंच.. ४०० ते ५०० रूपये किलो एवढे पैसे मोजून आपण ते तूप घेतो. पण त्याची शुद्धता किती, याबाबत आपल्या मनात मात्र शंका असतेच. म्हणूनच मनातली ही शंका काढून टाकण्यासाठी आणि दर महिन्याला आपल्या घरी येणारं तूप खरोखरंच शुद्ध आहे की भेसळीचं, हे ओळखण्यासाठी या ३ चाचण्या करून बघा.. तुपाची शुद्धता लगेचच तुमच्या लक्षात येईल.
१. विकतच्या तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी हा एक उपाय करून बघा. यासाठी एक तवा गरम करायला ठेवा. त्यावर १ चमचा तूप टाका. तूप जर लगेचच विरघळलं आणि ते रंगहीन झालं तर ते शुद्ध तूप आहे, असं समजावं. पण तूप वितळण्यासाठी वेळ लागला आणि विरघळल्यानंतरही तुपाचा रंग पिवळाच असला तर त्यात भेसळ आहे, असं समजावं.
२. थोडंसं तूप तुमच्या हाताच्या तळव्यावर घ्या. तूप जर काही सेकंदात विरघळू लागलं तर ते शुद्ध असतं. तूप चटकन विरघळलं नाही, तर त्यात भेसळ असते. हा नियम थंडीमध्ये लागू होत नाही. पण सध्याच्या वातावरणात अशा पद्धतीने तुम्ही तुपाची चाचणी करू शकता.
आहार की व्यायाम? वजन कमी करण्यासाठी काय जास्त महत्त्वाचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
३. एक चमचा तूप घ्या. ते तापवून विरघळून घ्या. काचेच्या पारदर्शक बाटलीत ते भरा. त्यात एक टीस्पून साखर टाका. बाटलीचं झाकण लावून घ्या. काही वेळाने तर बाटलीच्या तळाशी लालसर, केशरी रंग दिसू लागला तर त्याचा अर्थ असा की त्या तुपामध्ये भेसळ आहे.