Join us  

पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:36 PM

How To Consume Barley For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन कसे  करावे ते समजून घेऊ

वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) आहारात बदल करणं फार महत्वाचे असते. सुरूवातीला डाएट किंवा लाईफस्टाईलमध्ये बदल करणं कठीण असतं नंतर सवय झाली की काही वाटत नाही. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे धान्य जसं की गहू, ओट्स, बाजरी, नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. या यादीत जवसाचाही समावेश आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जवसाचा आहारात समावेश करू  शकता. वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन कसे  करावे ते समजून घेऊ. (Weight Loss Tips Barley For Weight Loss Fat Loss)

सायंस डायरेक्टच्या रिपोर्टनुसार जवसात डायटरी फायबर्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे बराचवेळ क्रेव्हिंग्स होत नाहीत आणि कॅलरी इंटेक कमी होतो. याच्या सेवनानं मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. प्लाझ्मा कोलेस्टेरॉल कमी होतो कॅलरीज बर्न होऊ लागतात. हे एक ग्लुटेन फ्री पदार्थ असून यामुळे कोलेस्टेरॉल आणि शुगर बॅलेंस राहतो. जवस हॉर्मोन बुस्ट करण्यात मदत करते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 

जवसाचे सूप कसे बनवायचे?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात जवसाचे सूप पिऊ शकता. हा लाईट डिनरसाठी परफेक्ट पर्याय आहे. सूप बनवण्यासाठी तुम्हाला टोमॅटो, कांदा, जवस, कोथिंबीर आणि मसाले वापरावे लागतील. एक बाऊल जवसाचे सूप प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहील.

जवसाची चपाती

जवसाची चपाती वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही जवसाच्या पीठाचा वापर करू शकता. हे पीठ गव्हाच्या पीठासोबत मिक्स करून खाऊ शकता. जवसाच्या चपातीत कमीत कमी कॅलरीज असतात ज्यामुळे पोट लवकर भरतं. 

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

जवसाचा दलिया

वजन कमी करण्यासाठी दलिया चांगला पर्याय आहे. तुम्ही नाश्त्याला किंवा दुपाराच्या जेवणाला दलिया खाऊ शकता. यात फायबर्स जास्त असल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन सहज होते. दलिया तयार करण्यासाठी तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्या मिसळू शकता. ज्यामुळे तुम्हाला बराचवेळ भूक लागणार नाही आणि वजन कमी  होण्यास मदत होईल.

हळदीचं दूध चांगलं पण हे ५ त्रास असतील तर चुकूनही पिऊ नका हळदीचं दूध, तब्येत खराब होईल

जवसाचा चहा

दिवसातून एकदा तुम्ही जवसाचा चहा बनवून पिऊ शकता. जर तुम्हाला कोणताही हेल्थ इश्यू असेल तर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात जवस उकळवून घ्या नंतर गाळून या चहाचे सेवन करा. यात तुम्ही आवडीनुसार गूळ, मध घालू शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स