निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी पौष्टीक आहार खाणं गरजेचं आहे (Fenugreek Seeds). काहींचं वजन झपाट्याने वाढतं. पण कमी करताना नाकीनऊ येतात (Weight Loss). वजन कमी करणं सोपं नाही (Fitness). अनेकांचं व्यायाम आणि डाएट फॉलो करूनही वेट लॉस होत नाही. वजन वाढलं की, स्किन आणि केसांच्या निगडीत समस्याही वाढतात. जर आपलेही वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल झाले असतील तर, एकदा मेथी दाण्याचा सोपा उपाय करून पाहा(How to consume fenugreek seeds for weight loss?).
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरते. त्यात लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारखे पौष्टीक घटक असतात. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. जर आपल्याला कॅलरी बर्न करायच्या असतील तर, एकदा मेथी दाण्यांचा सोपा करून पाहा.
मेथीचे पाणी
नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी आपण मेथीचे पाणी पिऊ शकता. यासाठी मेथीचे पाणी पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी प्या. मेथीचे दाणे भिजवल्याने त्याचे विरघळणारे तंतू बाहेर पडतात, जे पोटात पसरतात, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
आंबट ढेकर येतात, सतत लाळ गळते? 'या' ४ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण..
मेथीचा चहा प्या
दूध - साखरेचा चहा पिण्यापेक्षा आपण मेथी दाण्यांचा चहा पिऊ शकता. मेथी दाण्यांचा चहा शरीराला डिटॉक्स करतात. शिवाय पचनक्रियाही सुधारते. यासाठी रात्री पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथी दाण्याचे पाणी उकळवून प्या.
केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा
मेथी दाण्याची पावडर
मेथीच्या दाण्यांची पावडर बनवूनही सेवन करू शकता. मेथीच्या बियांची पावडर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, भूक कमी आणि चयापचय दर वाढविण्यास मदत करते. मेथीच्या दाण्याची पावडर बनवण्यासाठी प्रथम मेथी दाणे कोरडी भाजून बारीक वाटून घ्या. आता ही पावडर एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा आणि नियमित प्या.