Join us  

पोट लटकतंय, मांड्या जाड दिसतातत? मूठभर मनुके 'या' पद्धतीने खा; झरझर कमी होईल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:58 AM

How To Consume Raisins To Fat Loss :

मनुके (Raisins) एक असा पदार्थ आहे  जो आपल्या गुणांसाठी ओळखला जातो. फक्त अन्नाला चव  येण्यासाठीच नाही तर इतर गोष्टींतही मनुके फायदेशीर ठरतात. शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास इतर त्रासही उद्भवतात. वजन कमी करण्यासाठी मनुक्यांचे सेवन करू शकता.  शरीरात वेगवगेळ्या ठिकाणी फॅट्स जमा होतात.  साठलेलं फॅट कमी करण्यासाठी तुम्ही चरबी कमी करू शकता. (Raisins For Weight Loss Weight Loss Health Benefits)

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की सकाळच्या वेळी नाश्त्याला तुम्ही मनुक्यांचे सेवन करू शकता.  यामुळे तुम्हाला बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं. यात कॅलरीज जास्त असतात. तुम्ही काय खाता आणि किती प्रमाणात खाता हे लक्षात घ्या ज्यामुळे वजन वाढ थांबेल. (How To Consume Raisins To Fat Loss)

मनुके खाल्ल्याने वजन कमी होतं का?

यात फायबर्स असतात ज्यामुळे गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्स रोखण्यास मदत होते. याच्या सेवनाने मेटाबॉलिक रेट वाढतो. ज्यामुळे अन्न सहज पचते आणि तुम्हाला भूक लागत नाही. पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं ज्यामुळे थकवा जाणवत नाही. मनुके  खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मनुक्यांचे सेवन करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी मनुके खा किंवा त्याचे पाणी प्या. 

पचनाच्या समस्या टाळता येतात

मनुक्यांमध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात.  ज्यामुळे मल त्याग नियंत्रित करण्यास मदत मिळते. गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होतो.  मनुक्यांमध्ये वापरला जाणारा साखर हा एक नैसर्गिक घटक आहे.  ज्यामुळे उर्जेचा स्तर वाढतो. नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

डोक्यात सतत विचार-लहानसहान गोष्टींचा स्ट्रेस येतो? ५ उपाय-२ मिनिटांत स्ट्रेस कमी होईल

मनुके बोरॉनचा एक चांगला स्त्रोत आहे. यातील मिनरल्स हाडांना निरोगी ठेवतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळतो. मनुक्यांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीराचा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव होण्यास मदत होते. 

मनुके खाण्याची योग्य वेळ (Right Time To Eat Raisins)

तुम्ही मनुक्यांचे सेवन सकाळच्यावेळी नाश्त्यासाठी करू शकता. जर तुम्ही ओट्सचा नाश्ता बनवत असाल तर त्यात मनुके घाला. मनुके नॅच्युरल सारखेरचा चांगला स्त्रोत आहे. व्यायामाला जाण्याआधी मनुके खाऊन जा. मनुके खाल्ल्याने गोड खाण्याचे क्रेव्हिंग्स की होतात यात फायबर्स भरपूर असतात ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं. 

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य