Join us  

वजन कमी करायचंय पण सतत भूक लागते? तज्ज्ञ सांगतात, याचं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 9:10 AM

How To Control Hunger When We are on Weight Loss : भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी काय करावं याविषयी

ठळक मुद्देकमी झोप घेतली तर ग्रेहलिनचे प्रमाण वाढते म्हणजेच आपली भूक वाढते. प्रोटीनमुळे आपली भूक कमी होते तसेच दिर्घकाळ आपले पोट भरल्यासारखे वाटते.

वजन कमी करणं हा अनेक जणांपुढील एक महत्त्वाचा टास्क असतो. वाढलेलं वजन तर कमी करायचंय पण सतत भूक लागते अशी समस्याही वजन कमी करणाऱ्यांपैकी अनेकांना भेडसावते. आता वजन कमी करायचं असल्याने आपल्याला मर्यादेत खायचं असतं. मात्र आपल्याला भूक सहन होत नाही आणि आपल्याकडून जास्तीचे खाल्ले जाते. असं अनेकदा बऱ्याच जणांचे होते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या आपल्या उद्दीष्टापर्यंत आपण पोहोचतच नाही. आता हे होण्यामागे नेमकं काय कारण असतं, भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी काय करावं याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी या समस्येविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. असे होण्यामागे काय कारण असावं याविषयी त्या विस्ताराने समजावून सांगतात (How To Control Hunger When We are on Weight Loss).

(Image : Google)

१. अनेकदा आपल्याला वजन कमी करायचं असूनही खूप भूक लागते याचं कारण हे आर्टीफिशियल अॅपेटाईट असून नॅचरल अॅपेटाईट नसते. आपल्याला साधारणत: आपण नियमितपणे ज्यावेळी जेवण करतो त्याचवेळी भूक लागते. एरवी भूक लागण्याचे कारण नसते. 

२. पण आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स असतात ज्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. यातील सर्वात महत्त्वाचा हार्मोन आहे ग्रहेलिन, हा हार्मोन आपल्या पोटात तयार होतो आणि तो भूक लागण्यासाठई सगळ्यात महत्त्वाचा असतो. 

३. आपल्या जेवणाच्या वेळेला हा हार्मोन तयार होतो, म्हणजेच आपण रोज दुपारी १ वाजता जेवत असू तर साधारणपणे १ वाजताच्या दरम्यान या हार्मोनची निर्मिती व्हायला सुरुवात होते. या हार्मोनचा इफेक्ट केवळ १ तास असतो. अशावेळी तुम्ही पाणी किंवा ग्रीन टी घेतले तर त्याचा परिणाम कमी होतो आणि आपली भूक आपोआप कमी होते. 

४. भूक लागण्याचे प्रमाण कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आहारात प्रोटीनचा समावेश वाढवणे. प्रोटीनमुळे आपली भूक कमी होते तसेच दिर्घकाळ आपले पोट भरल्यासारखे वाटते. प्रोटीनमुळे ग्रेहलिनची मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पर्यायाने आपण वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठू शकतो. 

५. ग्रेहलिन नियंत्रणात ठेवण्याचा आणखी एक महत्त्वााचा उपाय म्हणजे पुरेशी झोप घेणे. कारण कमी झोप घेतली तर ग्रेहलिनचे प्रमाण वाढते म्हणजेच आपली भूक वाढते. भूक वाढली की आपलं वजन कमी होण्याचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.    

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्य