Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > गोडधोड खाऊनही दिवाळीत वजन- शुगर वाढणार नाही, फक्त ५ गोष्टी सांभाळा- एन्जॉय कराल...

गोडधोड खाऊनही दिवाळीत वजन- शुगर वाढणार नाही, फक्त ५ गोष्टी सांभाळा- एन्जॉय कराल...

How To Control Weight And Sugar In Diwali: दिवाळीचा फराळ, गोडधोड पदार्थ खाऊन वजन, शुगर वाढण्याचं टेन्शन आलं असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा...(how to enjoy diwali faral and sweets in healthy way?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 09:05 AM2024-10-25T09:05:59+5:302024-10-25T09:10:01+5:30

How To Control Weight And Sugar In Diwali: दिवाळीचा फराळ, गोडधोड पदार्थ खाऊन वजन, शुगर वाढण्याचं टेन्शन आलं असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा...(how to enjoy diwali faral and sweets in healthy way?)

how to control weight and sugar in diwali, how to enjoy diwali faral and sweets in healthy way | गोडधोड खाऊनही दिवाळीत वजन- शुगर वाढणार नाही, फक्त ५ गोष्टी सांभाळा- एन्जॉय कराल...

गोडधोड खाऊनही दिवाळीत वजन- शुगर वाढणार नाही, फक्त ५ गोष्टी सांभाळा- एन्जॉय कराल...

Highlightsतुम्हाला फराळाचा, गोड पदार्थांचा आनंद घेत दिवाळी छान एन्जॉय तर करता येईलच पण वजन आणि शुगर वाढण्याचं टेन्शनही राहणार नाही

वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या निमित्ताने घरात फराळाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. गोडधोड पदार्थ आणले जातात. एरवी आपण वर्षभर कंट्रोल करतो. पण फराळाच्या पदार्थांचा खमंग सुगंध आसपास दरवळू लागला की मग मात्र आपण नकळतपणे त्याकडे ओढ घेतो. खाताना मस्त बिंधास्त खातो. पण नंतर मात्र वजन आणि शुगर वाढली असेल की काय या विचारात पडतो (how to control weight and sugar in diwali?). या दिवाळीत स्वत:सोबत असं होऊ द्यायचं नसेल तर या काही टिप्स बघाच.. यामुळे तुम्हाला फराळाचा, गोड पदार्थांचा आनंद घेत दिवाळी छान एन्जॉय तर करता येईलच पण वजन आणि शुगर वाढण्याचं टेन्शनही राहणार नाही.(how to enjoy diwali faral and sweets in healthy way?)

 

दिवाळीत गोड पदार्थ, फराळ खाऊन वजन, शुगर वाढू नये म्हणून...

१. शक्य झालं तर दिवाळीच्या आधी तुमच्या डाएटिशियनकडे जाऊन या आणि त्यांच्याकडून खास दिवाळीच्या दिवसांसाठी तुमचा डाएट प्लॅन तयार करून घ्या. यामुळे तुम्हाला कोणता पदार्थ किती प्रमाणात खायला पाहिजे याचा अंदाज तर येईलच शिवाय मनात गोड पदार्थ, तेलकट- तुपकट पदार्थ खाल्ल्याचा गिल्टही राहणार नाही.

जे करु नका असं आईबाबा सांगतात तेच नेमकं मुलं करतात, असं का होतं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात... 

२. जेवणाच्या वेळा टळू देऊ नका. वेळच्यावेळी जेवा. जेवण करतानाच त्यात फराळाचे पदार्थ थोडे थोडे वाढून घ्या. जेणेकरून त्या पदार्थांचा आस्वादही घेता येईल आणि शिवाय तोंडावर आपोआपच नियंत्रण येईल. काही जण व्यवस्थित जेवण करून त्यानंतर फराळ करतात. यामुळे मग साहजिकच जास्त खाणं होतं आणि वजन वाढतं.

 

३. भरपूर पाणी प्या. तेलकट- तुपकट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला पुन्हा डिटॉक्स होण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या. डिहायड्रेशन होऊ देऊ नका.

वय वाढलं तरी सौंदर्य कमी होणार नाही! ४ गोष्टी नेमाने करा, पन्नाशीतही दिसाल पंचविशीतल्या...

४. या दिवसांमध्ये बदाम, अक्रोड, अव्हाकॅडो, ऑलिव्ह ऑईल तुमच्या आहारात योग्य प्रमाणात असू द्या. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. 

५. व्यायामामध्ये खंड पडू देऊ नका. सणासुदीच्या दिवसांत साहजिकच आपण व्यायामासाठी जास्त वेळ काढू शकत नाही. पण तरीही तुमचं नेहमीसारखं वर्कआऊट झालं नाही तरी थोडा का होईना पण न चुकता व्यायाम करा. 
 

Web Title: how to control weight and sugar in diwali, how to enjoy diwali faral and sweets in healthy way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.