Join us  

पाहा भात शिजवण्याची याेग्य पद्धत, शुगर असेल तरी बिंधास्त खा भात, वजनही राहील आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 11:52 AM

How To Cook Perfect Rice According To Ayurveda : भात शिजवताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी, भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन आणि शुगर

भात हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. देशभरातील कोकण किनारपट्टीत तर भात हेच मुख्य अन्न असते. जेवणात पोळी-भाजी, भाकरी किंवा अन्य काहीही असले तरी अनेकांना भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. भात करायला सोपा असल्याने आणि पचायला हलका असल्याने अगदी लहान बाळांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत आणि आजारी व्यक्तींनाही आवर्जून भात दिला जातो. वरण भाताशिवाय किंवा आमटी भाताशिवाय, खिचडी, पुलाव, मसालेभात, बिर्याणी, पोंगल, दही भात असे भाताचे एक ना अनेक प्रकार देशाच्या विविध भागात केले जातात (How To Cook Perfect Rice According To Ayurveda). 

साधारणपणे आपण कुकरमध्ये किंवा कधी पातेले, कढईमध्ये हे भाताचे प्रकार करतो. मात्र भाताचे पूर्ण पोषण मिळायचे असेल तर तो कशा पद्धतीने शिजवायला हवा याविषयी आयुर्वेदात काही नियम सांगितले आहेत. आहारतज्ज्ञ विपीन यांनी नुकताच भाताबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी भाताविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या कोणत्या पाहूया...

१. भात पचायला जड असतो, मात्र तो वात आणि पित्त प्रकृती स्थिर ठेवायला मदत करतो. पण कफ असेल तर भात खाणे शक्यतो टाळावे कारण भाताने कफ वाढण्याची शक्यता असते. 

२. तांदूळ नवीन असेल तर त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त जुना तांदूळ वापरावा. साधारणपणे १ वर्ष जुना तांदूळ वापरणे जास्त चांगले.

३. काही वेळा आपल्याला वेगळ्या प्रकरचा भात किंवा खिचडी करायची असेल तर आपण ती प्रेशर कुकरमध्ये भांडे न ठेवता डायरेक्ट शिजवतो. मात्र यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते. 

४. तसंच भात शिजवण्यासाठी आपण जितका तांदूळ घेतो त्याच्या ४ पट पाणी घ्यायला हवे. त्यानंतर एखाद्या पातेल्यात किंवा तत्सम भांड्यात झाकण न ठेवता भात शिजवावा.

५. भाज शिजत आला की त्याच्या वर राहिलेले पाणी गाळून काढून टाकावे, म्हणजे स्टार्च निघून जाण्यास मदत होते. डायबिटीस असणारे किंवा वजन कमी करायचे असेल असे लोक हा भात कोणत्याही टेन्शनशिवाय खाऊ शकतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्समधुमेहअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य