Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

Proper method for cooking rice for avoiding weight gain: वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे भात खाणं कमी करत असाल तर एकदा भात शिजवण्याची ही योग्य पद्धत पाहून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 01:43 PM2023-12-20T13:43:21+5:302023-12-20T16:20:13+5:30

Proper method for cooking rice for avoiding weight gain: वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे भात खाणं कमी करत असाल तर एकदा भात शिजवण्याची ही योग्य पद्धत पाहून घ्या...

How to cook rice in a healthy way? How to control weight by eating rice? Important tips for cooking rice, Proper method for cooking rice for avoiding weight gain | भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

Highlightsकाही दिवस हा उपाय करून पाहायला हरकत नाही. 

जे लोक कायम वजन वाढीच्या चिंतेत असतात, ते लोक भात खाणं टाळतात. भात खाल्ला तर वजन वाढतं, असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. आणि ते बऱ्याच अंशी बरोबरदेखील आहे. कारण भातासाठी आपण जे तांदूळ घेतो ते आणि ते ज्या पद्धतीने शिजवतो, ती पद्धत... या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत (How to control weight by eating rice?). या दोन्ही गोष्टीत थोडा बदल केला तर नक्कीच भात खाल्ल्याने वजन वाढणार नाही (How to cook rice in a healthy way?). म्हणूनच कोणता तांदूळ खावा आणि तो कशा पद्धतीने शिजवावा, या दोन गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही दिवस हा प्रयोग करून पाहा... बघा भात खाऊन वजनात नेमका काय फरक पडतोय ते...(Proper method for cooking rice for avoiding weight gain)

 

तांदूळाची योग्य निवड

हल्ली बहुतांश लोक पांढरा स्वच्छ दिसणारा तांदूळ खरेदी करतात. हा तांदूळ पॉलिश केलेला असल्याने दिसायला एकदम चकाचक असतो. त्यामुळे मग तोच उच्च दर्जाचा असं समजून आपण तो घेतो.

फक्त १० रुपयांचा बिस्कीट पुडा आणा- कुकरमध्ये एकदम स्पाँजी केक करा.. बघा रेसिपी 

पण असा पॉलिश तांदूळ खाणं हे वजन वाढीचं एक कारण असू शकतं. दक्षिण भारतात बहुतांश लोक पॉलिश न केलेला तांदूळ खातात. 

 

भात शिजविण्याची योग्य पद्धत

भात असो किंवा खिचडी असो आपण ती कुकरमध्येच लावतो. हे देखील भात खाऊन वजन वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. दक्षिण भारतीय लोक जेव्हा भात करतात, तेव्हा ते तांदूळ पातेल्यामध्ये शिजवतात.

डाळ- तांदुळात नेहमीच किडे होतात? ५ उपाय करा, किडे- अळ्या अजिबात होणार नाहीत

सगळ्यात आधी ते तांदुळ स्वच्छ धुतात. त्यानंतर तो पाणी टाकून पातेल्यात शिजायला ठेवतात. काही मिनिटांनी तांदुळावर फेस जमा होतो. हा फेस ते काढून टाकतात आणि त्यानंतर पुन्हा गरजेनुसार पाणी टाकून भात शिजवतात. अशा पद्धतीने तांदूळ शिजवला आणि पॉलिश न केलेला तांदूळ वापरला तर नक्कीच भात खाल्ल्यामुळे वजन वाढणार नाही. काही दिवस हा उपाय करून पाहायला हरकत नाही. 

 

Web Title: How to cook rice in a healthy way? How to control weight by eating rice? Important tips for cooking rice, Proper method for cooking rice for avoiding weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.