भारताच्या प्रत्येक घरात भात आवडीने खाल्ला जातो. रोज भात खाल्ल्याने वजन वाढतं, भाताने पोट सुटतं असे समज गैरसमज लोकांच्या मनात असतात. ज्यामुळे लोक भात खाणं पूर्ण बंद करतात तर काहीजण रात्री भात खाणं टाळतात. (How To Cook White Rice For Weight Loss) खरं पाहता वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोकही भाताचा आनंद घेऊ शकतात फक्त त्यासाठी भात शिजवण्याची योग्य पद्धत माहीत असावी लागते. भात शिजवण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर तुम्ही सहज वजन नियंत्रणात ठेवू शकता. (White rice for weight loss 3 hacks to make rice beneficial for weight loss)
वजन कमी करण्यासाठी भात खाणं बंद का करतात?
वेट लॉस करताना भाताचा आहारात समावेश केला जात नाही कारण जेव्हा तुम्ही अतिरिक्त कॅलरीज कमी करण्याचा विचार करता तेव्हा उच्च कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ वगळले जातात किंवा खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात. तांदूळ स्टार्चने परिपूर्ण असतो. ज्यामुळे कॅलरीज इन्टेक जास्त होतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
स्टार्च गाळून घ्या
तांदळातील स्टार्च कमी करण्याची तिसरी आणि महत्वाची टेक्निक म्हणजे पाण्यात तांदूळ अर्धवट शिजवल्यानंतर ते गाळून घ्या. हा उपाय तांदूळातील अतिरिक्त स्टार्च हटवण्यास मदत करेल. तांदूळ थंड पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या. नंतर गरजेनुसार तांदूळ शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करा. तांदळाला न झाकता, जवळपास १५ मिनिटं उकळून घ्या. शिजवताना मध्येमध्ये हलवत राहा.
पोट सुटत चाललंय, व्यायामासाठी वेळच नसतो? रोज इतका वेळ चाला-आपोआप कमी होईल फॅट
नारळाबरोबर शिजवा
भात शिजवताना नारळाचं तेल मिसळा आणि शिजल्यानंतर तांदूळ फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे तांदळातील कॅलरीजचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. भातामध्ये प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण वाढवल्यामुळे असे होते. जे एक प्रकारचे फायबर आहे जे शरीर पचवू शकत नाही. अर्धा कप तांदूळात १ चमचा नारळाचं तेल मिसळा. नारळाच्या तेलात पाणी मिसळून उकळत्या पाण्यात घाला आणि जवळपास ४० मिनिटं शिजवून घ्या. शिजवल्यानंतर भात १२ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
ब्राऊन राईस किंवा पांढरा भात
यापैकी दोन्ही भातांचे सेवन तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. पांढरे तांदूळ आणि ब्राऊन राईसमध्ये इतकाच फरक आहे की पांढऱ्या तांदूळांना पचायला बराचवेळ लागतो. दोन्ही प्रकारच्या भातांचे तुम्ही सेवन करू शकता. पॅराबॉईल्ड राईससुद्धा उत्तम उपाय आहे.
दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत
रिसर्चनुसार पांढऱ्या भाताऐवजी जर तुम्ही ब्राऊन राईस खायला सुरूवात केली तर वजन कमी करणं अधिक सोपं होऊ शकतं. ब्राऊन राईसचा आहारात समावेश केल्यास फक्त ३० मिनिटं वेगाने चाला. अभ्यासानुसार रोजच्या आहारात फायबर्सचे प्रमाण वाढवल्याने तुम्ही १०० कॅलरीज कमी करू शकता.