Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उपवास करुनही वजन घटलं नाही? १ कप ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक प्या, तुमच्यातला बदल दिसेल चटकन...

उपवास करुनही वजन घटलं नाही? १ कप ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक प्या, तुमच्यातला बदल दिसेल चटकन...

Homemade Drink That Helps Deep Clean Your Body : homemade drinks that can help with body detoxification during Navratri : How to detox your body during Navratri : उपवासादरम्यान प्यायल्या जाणाऱ्या या डिटॉक्स ड्रिंक्सची सोपी रेसिपी पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 05:57 PM2024-10-09T17:57:18+5:302024-10-09T18:11:54+5:30

Homemade Drink That Helps Deep Clean Your Body : homemade drinks that can help with body detoxification during Navratri : How to detox your body during Navratri : उपवासादरम्यान प्यायल्या जाणाऱ्या या डिटॉक्स ड्रिंक्सची सोपी रेसिपी पाहूयात...

How to detox your body during Navratri Homemade Drink That Helps Deep Clean Your Body homemade drinks that can help with body detoxification during Navratri | उपवास करुनही वजन घटलं नाही? १ कप ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक प्या, तुमच्यातला बदल दिसेल चटकन...

उपवास करुनही वजन घटलं नाही? १ कप ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक प्या, तुमच्यातला बदल दिसेल चटकन...

सध्या नवरात्रीचा सण सुरु आहे. नवरात्रीच निमित्त साधून अनेकजण उपवास करतात. उपवास केल्याने आपले शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स तर होतेच पण आपण डिटॉक्स ड्रिंक्सच्या मदतीने हे अधिक सोप्या पद्धतीने करु शकतो. डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे मुख्य काम करतात. तुमची पचनक्रिया सुधारण्यासोबतच उपवास केल्याने रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होते. उपवासाच्या वेळी अन्नपदार्थांऐवजी द्रवपदार्थ जास्त प्रमाणात प्यायले पाहिजेत, तर शरीर चांगले डिटॉक्सिफाय(homemade drinks that can help with body detoxification during Navratri) करता येते. याशिवाय पचनक्रिया सुधारण्याबरोबरच पोट आणि त्वचेशी संबंधित समस्याही उपवासामुळे कमी होतात. वजन कमी करण्यासाठी उपवास करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो(Navratri Spcial Detox Drink).

 उपवासाबरोबरच जर आपण उपवासाचे डिटॉक्स ड्रिंक्स (Whole Body Detox During Navratri) घेतले तर त्याचा चांगला फायदा आपल्या आरोग्याला होतो. उपवास करताना जर आपण हे डिटॉक्स ड्रिंक्स घेतले तर अनेक फायदे मिळू शकतात. पचनक्रिया मजबूत करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, वजन कमी करणे आणि हाय शुगर लेव्हल कमी करण्यास यांनी मदत मिळू शकते. उपवासा दरम्यान प्यायल्या जाणाऱ्या या डिटॉक्स ड्रिंक्सची सोपी रेसिपी पाहूयात. आहारतज्ज्ञ रमिता कौर यांनी त्यांच्या dt.ramitakaur या इन्स्टाग्राम पेजवरून उपवासाचे बॉडी डिटॉक्स ड्रिंक कसे तयार करायचे याची रेसिपी आणि ते पिण्याचे फायदे काय आहेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे(How to detox your body during Navratri).  

साहित्य :- 

१. बीटरुट - १/२ कप 
२. दुधी - १/२ कप 
३. काकडी - १ कप 
४. आवळा - १/२ कप 
५. आलं - २ ते ३ इंचाचा छोटा तुकडा
६. गाजर - १ कप 
७. पुदिना - १/२ कप 
८. कोथिंबीर - १/२ कप 
९. सैंधव मीठ - चवीनुसार 

वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...


गरबा खेळून पाय खूप दुखतात? करा ७ सोपे स्ट्रेचिंग-दुसऱ्या दिवशी पुन्हा गरबा खेळाल जोशात...

कृती :- 

१. सगळ्यात आधी बीटरुट, दुधी, काकडी, आवळा, आलं, गाजर स्वच्छ धुवून मग त्यांचे छोटे तुकडे करुन घ्यावेत. 
२. आता एका मोठ्या बाऊलमध्ये बीटरुट, दुधी, काकडी, आवळा, आलं, गाजर यांचे छोटे तुकडे घेऊन त्यात पुदिना व कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. 
३. एक मिक्सर जार घेऊन त्यात हे सगळे जिन्नस एकत्रित घालावे. मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित ब्लेंड करून घ्यावे. 
४. आता हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलेले सगळे जिन्नस एका गाळणीत काढून गाळून घ्यावे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार या मिश्रणात पाणी घालून मिक्स करून घ्यावे. सगळ्यात शेवटी या डिटॉक्स ड्रिंकमध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित ढवळून घ्यावे. 

उपवासासाठी खास डिटॉक्स ड्रिंक पिण्यासाठी तयार आहे. हे डिटॉक्स ड्रिंक आपण  एका ग्लासात ओतून पिण्यासाठी सर्व्ह करु शकता.  

  उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या १० टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

हे डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे फायदे :- 

हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने तुमचे शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहील. कारण या डिटॉक्स ड्रिंकमध्ये असलेल्या काकडीमध्ये ९५ % पेक्षा जात पाण्याचे प्रमाण असते. याशिवाय यात आपल्या शरीराला थंड करण्याचे अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. आवळ्यामध्ये असणाऱ्या ऍसिडिक गुणधर्मामुळे पचनक्रिया योग्य पद्धतीने काम करते. पुदिन्यामुळे आपले शरीर थंड राहते. हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन कमी करण्यास देखील मदत करते. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. याचबरोबर हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहिल्याने आपल्याला उपवासादरम्यान वारंवार भूक लागत नाही.

Web Title: How to detox your body during Navratri Homemade Drink That Helps Deep Clean Your Body homemade drinks that can help with body detoxification during Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.