Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

5 Anti Inflammatory Diet Foods To Help You Lose Weight Like Vidya Balan : How To Do An Anti Inflammatory Diet For Weight Loss Like Vidya Balan, Samantha : What is Anti Inflammatory Diet That Helped Vidya Balan In Her Weight Loss Journey : अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच सांगितले की ती 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करते, डाएटचा हा नवीन ट्रेंड कोणता ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 02:19 PM2024-11-13T14:19:18+5:302024-11-13T14:20:46+5:30

5 Anti Inflammatory Diet Foods To Help You Lose Weight Like Vidya Balan : How To Do An Anti Inflammatory Diet For Weight Loss Like Vidya Balan, Samantha : What is Anti Inflammatory Diet That Helped Vidya Balan In Her Weight Loss Journey : अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच सांगितले की ती 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करते, डाएटचा हा नवीन ट्रेंड कोणता ते पाहूयात...

How To Do An Anti Inflammatory Diet For Weight Loss Like Vidya Balan, Samantha 5 Anti Inflammatory Diet Foods To Help You Lose Weight Like Vidya Balan | विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

'भूलभुलैया ३' या हिंदी चित्रपटात 'मंजुलिका' ची भूमिका साकारणारी विद्या बालन (Vidya Balan) सध्या फारच चर्चेत आहे. या चित्रपटात तिने केलेला अभिनय आणि या भूमिकेसाठी तिने घटवलेले वजन हा चर्चेचा विषय आहे. अनेक हिंदी चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या विद्याला मात्र तिच्या वजनावरुन फार ट्रोल करण्यात आले होते. वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला वाटत असेल की हे केवळ सामान्य लोकांसाठीच आहे तर तसे नाही. अनेक सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. बदलत्या काळानुसार डाएटचे ट्रेंडही बदलत असतात. भूलभुलैया ३ या हिंदी चित्रपटात 'मंजुलिका' ची भूमिका साकारण्यासाठी तिने 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करुन आपले वजन घटवल्याचे समोर येत आहे. सध्या हे 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट (Anti Inflammatory Diet) फॉलो करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. फक्त विद्याच नाही तर बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री हे डाएट फॉलो करत आहेत. विद्या प्रमाणेच समंथाने देखील हे डाएट करुन वजन कमी केले आहे(5 Anti Inflammatory Diet Foods To Help You Lose Weight Like Vidya Balan).

अभिनेते किंवा अभिनेत्रींचे व्यायामप्रकार, आवडीचे पदार्थ किंवा डाएट जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडते. एखाद्या अभिनेत्रीने वाढलेले वजन कसे कमी केले याबाबत तर आपल्याला खूप उत्सुकता(How To  Do  An  Anti Inflammatory Diet For Weight Loss Like Vidya Balan, Samantha) असते. सध्या अभिनेत्री विद्या बालन हिने अचानक बरेच वजन कमी केल्याने ती स्लिम ट्रिम झालेली दिसते. त्यामुळे तिच्या या वेटलॉसची बरीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळते. आता विद्याने हे 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करुन वजन घटवले तरी कसे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट म्हणजे काय आणि त्यात नेमके काय करायचे असते ते पाहूयात(What is Anti Inflammatory Diet That Helped Vidya Balan In Her Weight Loss Journey).

विद्या बालन फॉलो करते 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट... 

चेन्नईस्थित अमुरा हेल्थच्या मदतीने 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो केल्याचे विद्या सांगते. या डाएट प्रकारामध्ये, आपल्या आहारातील दाहक-विरोधी म्हणजेच नैसर्गिकरित्या जळजळ कमी करणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर दिला जातो. हा आहार अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि ओमेगा - ३ फॅटी ऍसिडस् अशा पदार्थानी समृध्द असतो. यासोबतच, हे डाएट फॉलो करताना समजा एखाद्या व्यक्तीला अमुक एखादा पदार्थ खाऊन जळजळ होत असेल तर असे पदार्थ डाएटमधून काढून टाकले जातात.  

चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार...

मुंबईतील न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस तज्ज्ञ देबजानी गुप्ता यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अँटी इंफ्लेमेटरी' आहार घेण्यापूर्वी, आपल्या शरीरात कोणकोणते पदार्थ खाल्ल्याने जळजळ होते हे आधी समजून घेतले जाते. याचबरोबर, शरीराला सूज आणणारे पदार्थ खाणे देखील टाळले जाते. 

 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करताना कोणते पदार्थ खावेत? 

१. फळे आणि भाज्या :- विशेषतः पालेभाज्या, बेरी आणि लिंबूवर्गीय फळे, ज्यात व्हिटॅमिन 'सी' आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात.

२. धान्य :- ब्राऊन राईस, क्विनोआ आणि ओट्स असे पदार्थ हे भरपूर फायबरयुक्त असतात. हे पदार्थ आपल्या पचनमार्गात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.

विद्या बालन करते 'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?

वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर...

३. हेल्दी फॅट्स :- ऑलिव्ह ऑईल, नटस, सीड्स आणि एवोकॅडो यांसारखे पदार्थ मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा - ३ फॅटी ऍसिडने समृद्ध असतात, जे त्यांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांशी ओळखले जातात.

४. प्रथिने :- चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स सारख्या बियांमध्ये ओमेगा - ३ चे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरात होणाऱ्या जळजळीशी लढण्यासाठी आवश्यक असतात.

५. मसाले आणि औषधी वनस्पती :- हळद, आले आणि लसूण यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी संयुगे असतात. जे आपल्या शरीरातील जळजळ कमी करण्यास फायदेशीर असतात.

Web Title: How To Do An Anti Inflammatory Diet For Weight Loss Like Vidya Balan, Samantha 5 Anti Inflammatory Diet Foods To Help You Lose Weight Like Vidya Balan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.