Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

How To Do Fast For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी उपवास करता, पण वजन कमीच होत नाही. असं तुमचंही होत असेल तर उपवास करताना ही पथ्यं पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 12:06 PM2024-04-18T12:06:54+5:302024-04-18T12:09:08+5:30

How To Do Fast For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी उपवास करता, पण वजन कमीच होत नाही. असं तुमचंही होत असेल तर उपवास करताना ही पथ्यं पाळा...

How to do fast for weight loss, weight loss tips, how can fast helps for weight loss? correct method of doing fast for health and weight loss | वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

Highlightsउपवास करताना आपण कमी प्रमाणात आहार घेऊन पचनसंस्थेला आणि इतर अवयवांना आराम दिला तर शरीरात आपाेआप डिटॉक्स प्रक्रिया सुरू होते

उपवास करणाऱ्या मंडळींची संख्या आपल्याकडे खूप जास्त आहे. कोणी धार्मिक कारणाने उपवास करतं, तर कोणी धार्मिकता आणि वेटलॉस या दोन्ही कारणाने उपवास करतात. नुकतेच चैत्र नवरात्रीचे उपवासही अनेकांनी केले. पण बऱ्याच जणांना मात्र असा अनुभव येतो की ज्या उद्देशाने उपवास केले, ते वेटलाॅसचं टार्गेट मात्र काही केल्या पुर्ण होत नाही (How to do fast for weight loss). याचं कारण म्हणजे उपवास करताना आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत काही चूका हमखास करतो. तुम्हालाही उपवास करून वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या, याविषयी बघा ही खास माहिती... (correct method of doing fast for health and weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने उपवास करावा?

योग्य पद्धतीने उपवास केला तर वजन तर नक्कीच कमी होऊ शकते, पण त्यासोबतच आरोग्याला इतरही अनेक फायदे होऊ शकतात.

गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

उपवास करताना आपण कमी प्रमाणात आहार घेऊन पचनसंस्थेला आणि इतर अवयवांना आराम दिला तर शरीरात आपाेआप डिटॉक्स प्रक्रिया सुरू होते आणि शरीर विषारी पदार्थ बाहेर टाकते. हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब असे अनेक आजार कमी होऊ शकतात, अशी माहिती आहारतज्ज्ञ डॉ. मेघना पासी यांनी आजतकशी बोलताना दिली आहे. 

 

त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनसंस्थेला आराम मिळावा म्हणून तेलकट, तुपकट, जड पदार्थ खाऊ नका. शक्यतो फळं खाण्यावर किंवा फळांचा रस पिण्यावर भर द्या. कारण फळांमधून चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतात. त्यामुळे मग दिवसभर उर्जा टिकून राहण्यास मदत होते.

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कार्यक्रमाच्या किती दिवस आधी फेशियल करावं? बघा फेशियल करण्याची योग्य वेळ

करताना बाजारात मिळणारे रेडिमेड ज्यूस पिऊ नका. कारण त्यांच्यामध्ये साखरेचे आणि प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण खूप जास्त असते. घरी केलेलं सरबत, ताक, दही यावर भर द्या. राजगिऱ्याच्या पिठाची, शिंगाड्याच्या पिठाची भाकरी, रताळी असे पदार्थ खाऊ शकता. पण त्यांचं प्रमाण अगदीच मर्यादित ठेवा. 

 

Web Title: How to do fast for weight loss, weight loss tips, how can fast helps for weight loss? correct method of doing fast for health and weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.