पोट कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. (Weight Loss Tips) अनेकदा प्रयत्न करूनही लोकांचे वजन कमी होत नाही. काहीजण डाएट करतात तर काहीजण व्यायाम करतात.(Health Tips) चेहऱ्याच्या चरबीबरोबरच पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते. घरच्याघरी तुम्ही सोपे व्यायाम करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. फिटनेस एक्सपर्ट प्रियांका यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Yoga Pose To Reduce Belly With Chin Fat)
चरबीमुळे फक्त चेहऱ्याची सुंदरता कमी होत नाही तर डायबिटी, किडनी, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. चेहऱ्याची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. रोज १० मिनिटांत उष्ट्रासन केल्याने काही आठवड्यातच तुम्हाला फरक दिसून येईल. या उपायाने पोट आणि चिन स्ट्रेच होण्यास मदत होते. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. (Ustrasan Benefits For Weight Loss How to do Ustrasana)
कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद
चरबी कमी करण्यासाठी उष्ट्रासन
उष्ट्रासन हा शब्द संस्कृतातील २ शब्दांनी मिळून तयार झालेला शब्द आहे. उंट आणि आसन म्हणजे पोश्चरवरून हा शब्द आला आहे. याला कॅमल पोजही म्हटलं जातं. या आसनात शरीराची कृती उंटाप्रमाणे असते. पोट आणि चेहऱ्याची चरबी कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते.
उष्ट्रासन करण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी वज्रसानात बसा. त्यानंतर गुडघे बॅलेन्स करून हिप्सवर बसण्याचा प्रयत्न करा. नंतर हात डाव्या बाजूला न्या आणि डावा पंजा हाताला टेकवा, नंतर डाव्या हाताच्या मदतीने उजव्याला हाताचा पंजा व्यवस्थित ठेवा. काहीवेळ याच स्थितीत राहा. नंतर पुन्हा सामान्य स्थितीत या. कमीत कमी ५ वेळा हे योगासन करा.
उष्ट्रासन केल्याचे फायदे
उष्ट्रासन केल्याने शरीरावर स्ट्रेच येतो. पाय आणि मांड्याची चरबी कमी होते. पिरिडएड्सशी संबंधित समस्या उद्भवत नाही, ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते, पाठ, मसल्स मजबूत राहतात. पाठीचा कणा फ्लेक्सिबल राहचो. पोश्चर सुधारते, पाठदुखीच्या वेदना जाणवत नाहीत. अस्थमा, थायरॉईड कंट्रोल होत नाही, ताण-तणाव कमी होतो.