Join us  

3 Tips For Weight Loss: फक्त ३ सवयी बदलल्या तर वजन वाढणारच नाही, आणि वाढलेलं वजनही होईल लवकर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 3:08 PM

3 Mistakes That Causes Weight Gain: वजनाचा संबंध थेट आपल्या खाण्याशी आणि खाण्याच्या सवयींशी असतो. त्यामुळे जेवणाच्या काही सवयी बदला, वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल (How to do weight loss), असं सांगत आहेत, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा.

ठळक मुद्देनेहमीच रहाल स्लिम आणि परफेक्ट फिट, फक्त जेवताना पाळा हे ३ नियम, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

वजन वाढीच्या (weight gain) त्रासाने सध्या अनेक जणं हैराण आहेत. अगदी कॉलेजगोईंग तरुण- तरुणींपासून ते साठी ओलांडलेल्या वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेक जणांना त्यांचं वाढतं वजन त्रासदायक ठरतं. बरं हे वाढणारं वजन लवकर कंट्रोल (how to control weight) करता आलं तर ठिक. नाहीतर एकदा का वजनाचा काटा एक ठराविक टप्पा ओलांडून पुढे गेला की मग वजन काही लवकर कमी होण्याचं नाव घेत नाही. चयापचय क्रिया आणि पचन क्रिया (metabolism and digestion) जर व्यवस्थित पार पडल्या नाहीत, तर वजन वाढीचा त्रास होतो. या दोन क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी जेवताना काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. (3 Tips For Weight Loss)

 

जेवताना पाळा ही ३ पथ्ये सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा या नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असतात. ब्यूटी, फॅशन, फिटनेस याबाबत त्या नेहमीच उपयुक्त माहिती शेअर करतात. आता नुकताच त्यांनी एक छोटासा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्या जेवताना, नाश्ता करताना कोणती पथ्ये पाळावीत याविषयी माहिती सांगत आहेत. भात आवडतो? बिंधास्त खा, पण त्यासोबत भाज्या आणि सलाड किती खायचं? हे घ्या प्रमाणनियम १खाण्याचे प्रमाण योग्य असेल तर वाढतं वजन निश्चितच नियंत्रणात ठेवता येतं, यात काेणतंही दुमत नाही.  दिवसाच्या सुरुवातीला आपला मेटाबॉलिझम रेट म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन त्यांची चयापचय क्रिया होण्याचा वेग जास्त असतो. तो रात्रीपर्यंत हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता नेहमी हेवी करा, दुपारचं जेवण त्या तुलनेत कमी असावं आणि रात्रीचं जेवण आणखी कमी म्हणजेच अगदी हलकं- फुलकं असावं. यामुळे पचन आणि मेटाबॉलिझम या दोन्ही गोष्टी उत्तम पद्धतीने होतात. 

दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट

 

नियम २जेवताना अनेक जणांना पाणी पिण्याची सवय असते. ही सवय चुकीची आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते जेवणाच्या मध्ये किंवा जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रियेसाठी जे काही उपयुक्त एन्झाईम्स शरीरात तयार झालेले असतात, ते सगळे निष्क्रिय होतात. त्यामुळे जे खाल्लं आहे, त्याचं व्यवस्थित पचन होत नाही. फळं खा, वजन घटवा! वेटलॉससाठी खा 5 प्रकारची फळं, वजन कमी- स्किनवरही येईल ग्लो आणि त्यामुळे मग आहारातून पोटात गेलेली पोषणमुल्ये शरीराला मिळू शकत नाहीत. त्यामुळे पाणी एकतर जेवणाच्या काही मिनिटे आधी प्या. किंवा मग जेवण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी प्या. 

 

३. नियम ३ तुमच्या ताटात काय वाढलं आहे आणि ते तुम्ही कशा पद्धतीने किंवा कोणत्या क्रमाने खाता, यावरही तुमचं वजन वाढणार की कमी होणार हे अवलंबून असतं. त्यामुळे जेवताना सगळ्यात आधी ताटातले सलाड आणि कच्च्या भाज्या संपवा. त्यानंतर कार्ब्स आणि प्रोटीन्स यांचं कॉम्बिनेशन खा. म्हणजे भाजी, वरण आणि त्यासोबत भात किंवा पोळी. असं केल्यामुळे शरीरात ग्लुकोजची पातळी एकदम वाढणार नाही. तसेच शुगर आणि फॅट्स दोन्हीही कंट्रोलमध्ये राहतील. 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नआहार योजना