Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

How to drink milk for weight loss : वजन कमी करण्यासाठी दूध पिणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबल्यास पोटावरची चरबी कमी होईल आणि पूर्ण बॉडी फॅट सुद्धा मेंटेन होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 01:35 PM2023-06-28T13:35:25+5:302023-06-28T13:40:44+5:30

How to drink milk for weight loss : वजन कमी करण्यासाठी दूध पिणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबल्यास पोटावरची चरबी कमी होईल आणि पूर्ण बॉडी फॅट सुद्धा मेंटेन होईल.

How to drink milk for weight loss : Milk Diet For Fast Weight Loss | पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

आजकालची लाईफस्टाईल आणि अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेकजण वेट लॉस डाएट किंवा वेट लॉस ड्रिंक्स घेतात पण याचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही. (Milk Diet For Fast Weight Loss) वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोड खाणं सोडतात. दूध, दूग्धजन्य पदार्थ, डेअरी उत्पादनं  यांसारख्या हेल्दी पदार्थांपासून लांब राहतात. (How to drink milk for weight loss)

वजन कमी करण्यासाठी दूध पिणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबल्यास पोटावरची चरबी कमी होईल आणि पूर्ण बॉडी फॅट सुद्धा मेंटेन होईल. वजन कमी करण्यासाठी  सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आहारात बदल करायला हवा.

जर तुम्ही वेगानं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर दूधाचा सेवन फायदेशीर ठरू शकते. दूध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार दूग्धजन्य पदार्थ वजन कमी करण्यास साहाय्यक ठरतात.

१) दूध प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. जे शरीरात मसल्स बिल्डींगसाठी एक मॅकोन्यट्रिएंट आहे. दूध प्यायल्यानं पेप्टाईड YY हार्मोनमुळे बराचवेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे अनावश्यक क्रेव्हींग्स टाळता येतात.

२) दूधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मेटाबॉलिज्मचा विकास होतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत  होते.
दूध आणि केळ्याची स्मूदी प्रोटीन्स, कॅल्शियम, फायबर्स आणि पोटॅशियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. यातील पोषक तत्व पोट कायम भरलेलं ठेवतात.

३) दूध प्रोटीन, कॅल्शियम व्यतिरिक्त व्हिटामीन बी १२, मॅग्नेशियम आणि जिंकचा उत्तम स्त्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी स्किम्ड दूधाची निवड करायला हवी.  वजन कमी करण्यासाठी स्किम्ड मिल्कची निवड करा. कारण हा वजन घटवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

दूधात मिसळा दालचिनी

एक भांड घ्या आणि त्यात एक कप दूध आणि दालचिनीचे तुकडा घालून ते उकळवा आणि नंतर दालचिनीचे साल काढून टाका. एका कपामध्ये दूध घाला आणि चिमूटभर दालचिनी पावडरनं हे दूध सजवा.

चिया सिड्स पुडींग

बदामाचे दूध, दही, मेपल सिरप आणि व्हिनेगर एकत्र मिसळा. त्यानंतर चिया सिड्स व्यवस्थित फेटून घ्या रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा आणि एका पॅनमध्ये नारळाचा किस जवळपास १ ते  ३ मिनिटांसाठी भाजून घ्या नंतर थंड होऊ द्या आणि रात्री ठेवलेलं मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढा आणि गुठळ्या काढून टाका. त्यावर केळ्याचे तुकडे, कापलेली स्ट्रोबेरी आणि नारळाचे तुकडे घालून चिया सिड्सचं पुडींग सर्व्ह करा.

Web Title: How to drink milk for weight loss : Milk Diet For Fast Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.