Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन घटवण्यासाठी पाणी कसं प्यायचं? पाहा आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल

वजन घटवण्यासाठी पाणी कसं प्यायचं? पाहा आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल

How to Drink Water for Weight Loss (Vajan Kami karnyache upay) : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची खास पद्धत माहीत असायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:05 PM2023-12-31T12:05:47+5:302023-12-31T12:37:00+5:30

How to Drink Water for Weight Loss (Vajan Kami karnyache upay) : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची खास पद्धत माहीत असायला हवी.

How to Drink Water for Weight Loss : How to Lose Weight With Water Right Way to Drink Water | वजन घटवण्यासाठी पाणी कसं प्यायचं? पाहा आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल

वजन घटवण्यासाठी पाणी कसं प्यायचं? पाहा आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी खाण्यापिण्याशीसंबंधित सवयी बदलायला हव्यात. (Weight Loss Tips) खाणं-पिणं वेळेवर नसेल तर वजन  कमी करण्यात अडथळे येऊ शकतात. एक्सपर्ट्नी वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यात फायदेशीर ठरते. (How Drinking More Water Can Help You to Lose Weight) वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची खास पद्धत माहीत असायला हवी.  पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकते. इंटरनॅशनल योगा प्रशिक्षक दिलराज प्री कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to Drink Water for Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? (How to Lose Weight With Water)

आयुर्वेद डॉक्टर.नेटच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी उभे राहून पाणी पिऊ नका, तुम्ही मलासनात बसून पाणी पिऊ शकता. हिवाळ्यात नेहमी साधं किंवा कोमट पाणी प्या. एकाचवेळी जास्त पाणी पिऊ नका, हळूहळू पाणी प्या. त्यानंतर कौवा चालासन करा. मलासन करताना आपले पाय ट्विस्ट करा, मलासनात बसा, दोन्ही हात  गुडघ्यांवर ठेवा. ५ ते १० वेळा हे आसन करा.

पाणी पिण्याचे फायदे काय आहेत? (Benefits Of Drinking Water)

एक्सपर्टच्यामते या पद्धतीने पाणी प्यायल्यास शरीराला बरेच फायदे मिळतात.  गॅस, पोट साफ न होणं यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होईल.  पाणी न प्यायल्यास टॉक्सिन्स जमा न होणं वजन कमी करणं कठीण होऊ शकतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील तीन दोष वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष बॅलेन्स राहतील. जास्त तळलेलं, तिखट खाल्ल्यामुळे वातदोष वाढतो. शरीर हायड्रेट राहते आणि स्किन हेल्दी राहते. 

चुकीची वेळ आणि चुकीच्या पद्धतीने  पाणी प्यायल्यास पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.  डायबिटीस, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, किडनी प्रोब्लेम्स उद्भवतात.  प्रत्येकाच्या शरीरानुसार पाणी पिण्याची पद्धत वेगळी असते. पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असल्यास आजारी पडणं थांबवता येऊ शकतं.

गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्यायला हवं. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी पिणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढता येतं आणि शरीर डिटॉक्स होणं सहज शक्य होते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त जेवताना  ३० मिनिटं आधी पाणी प्या, यामुळे अन्न सहज पचते. 

अंघोळीच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या उद्भवत नाही. झोपण्याच्या आधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो. घरातून बाहेर निघताना पाणी पिऊन  मगच निघा. व्यायाम केल्यानंतरही पाणी पिणं महत्वाचे आहे ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणं. जर तुम्ही उभं राहून पाणी पाणी शरीराच्या खालच्या भागात जातं  ज्यामुळे शरीराल आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून उभं राहून पाणी पिऊ नका.

Web Title: How to Drink Water for Weight Loss : How to Lose Weight With Water Right Way to Drink Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.