प्रत्येक घरात वरण-भात (Dal-Rice) मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. वरण भात जास्त खाल्ल्यानंतर वजन वाढू लागेल असा अनेकांचा समज असतो. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करायाल हवा. घरचं रोजचं जेवण वजन कमी करण्याासाठी फायदेशीर ठरू शकते. (Weight Loss Tips) घरचं रोजचं जेवण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. फक्त या पदार्थांना योग्य पद्धतीने खाण्याची आश्यकता असते. (How To Eat Dal Chawal For Weight Loss)
याबाबत आहारतज्ज्ञ शंभवी यांनी अधिक माहिती दिली आहे. शंभवी या नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खाण्यापिण्यासंदर्भातील पोस्ट शेअर करत अससलतात. त्यांनी वजन कमी करण्यासाठी वरण भात कोणत्या पद्धतीने खावा याबाबत सांगितले आहे. (Right Way To Eat Dal Rice)
वजन कमी करण्यासाठी डाळ-भात कोणत्या पद्धतीने खावा?
आहारतज्ज्ञ सांगतात की वरण भात लोक पूर्ण प्लेट भरून घातात पण वजन कमी करण्यासाठी वरण भात खाण्याची योग्य पद्धत माहित असावी लागते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाळ आणि भात दोन्हींचा समावेश करायला हवा कारण यातून शरीराला कार्ब्स मिळतात.
कॅल्शियम पाहिजे पण दूध नको? डॉक्टर सांगतात रोज खा १ चमचा पांढरे तीळ, हाडांना येईल बळकटी
शरीरातील शुगर लेव्हलसुद्धा वेगाने वाढते. जेवणात जर वरण भात असेल तर तिसऱ्या भागात भाजीसुद्धा असायला हवी. याव्यतिरिक्त आपल्या आहारात प्रोटीन्सचा समावेश करा. प्रोटीनसाठी पनीर किंवा टोफू ताटात ठेवू शकता. तिसऱ्या भागात वरण भात घ्या. आहारातज्ज्ञ सांगतात की या पद्धतीने वजन कमी व्हायला मदत होते.
वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतील
१) रोज सकाळी उठून डिटॉक्स वॉटर किंवा चिया सिड्सचे पाणी प्या ज्यामुळे वजन कमी होईल. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने हलकं गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होणं सोपं होतं. ज्यामुळे शरीरातील एक्सेस फॅट कमी होते. तुम्ही जे खाता ते इंन्जॉय करू शकाल.
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, पोटदुखी थांबेल
२) जास्त ताण घेऊन खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. शरीर एक्टिव्ह ठेवणं खूप महत्वाचे आहे.
३) जेवल्यानंतर अर्धा तास वॉक करू शकता. जेवणानंतर वॉक करू शकत नसाल तर संध्याकाळी वॉक करा.
४) तुम्ही ताटात किती अन्न घेताय याकडे लक्ष द्या. पूर्ण प्लेट न भरता योग्य प्रमाणात अन्न ताटात घ्या.