Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > म्हणे, रात्री लवकर जेवा! पण ते जमवायचं कसं? जेवणाच्या वेळा चुकतातच कारण..

म्हणे, रात्री लवकर जेवा! पण ते जमवायचं कसं? जेवणाच्या वेळा चुकतातच कारण..

जेवणाच्या वेळा न चुकवणं, रात्री लवकर जेवणं हे खरंच इतकं अवघड आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2024 03:13 PM2024-03-25T15:13:17+5:302024-03-25T15:16:58+5:30

जेवणाच्या वेळा न चुकवणं, रात्री लवकर जेवणं हे खरंच इतकं अवघड आहे का?

how to eat early at night, why eating after 7 is not good for health? why eat early dinner, Meal times and health, what is the connection? | म्हणे, रात्री लवकर जेवा! पण ते जमवायचं कसं? जेवणाच्या वेळा चुकतातच कारण..

म्हणे, रात्री लवकर जेवा! पण ते जमवायचं कसं? जेवणाच्या वेळा चुकतातच कारण..

Highlightsकाय खावं आणि कधी खावं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.

सगळे सांगतात रोज वेळच्यावेळी जेवा. जेवण्याची वेळ चुकवू नका. अनेकजण सांगतात की सायंकाळी ७ नंतर जेवू नका. पण सामान्य माणसांना ते कसे जमावे? सायंकाळी ७ पर्यंत अनेकजण कार्यालयातून घरीच येत नाही, त्यानंतर स्वयंपाक-जेवण. मग ७ च्या आत जेवणार कसे? जेवणाच्या वेळा चुकणं हे तसं कॉमनच आहे. पण मग यावर उपाय काय? जेवणाच्या वेळांचं करायचं काय? नेमकं जेवायचं कधी

चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार तर महत्त्वाचा आहेच पण त्यासोबतच आपण रोज जेवणाची वेळ बदलतो का? रोज वाट्टेल तेव्हा जेवतो का? जेवणाच्या वेळा सतत बदलतात का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काय खावं आणि कधी खावं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.

(Image :google)

जेवणाच्या वेळांचं गणित जमवायचं कसं?

१. बहुतांश नोकरदार आणि व्यावसायिक हे सकाळी १० ते ६ या वेळात काम करतात. त्यांचं कामाचं स्वरूप मुख्वत्वे बैठया कामाचे असते.  शारीरिक श्रम कमी असतात. काम जास्त असतं, कामाचे टार्गेट असतात,  मनावरही सतत ताण असतो.
त्यांनी काय करावं? दुपारी ऑफिसात तर जेवणाची वेळ अजिबात चुकवू नये. सकाळी नाश्त्याला सुकामेवा, फळ, कोरडा पौष्टिक खाऊ खावा. दुपारी जेवणाची वेळ खूप उशीरा असेल तर सकाळी १०.३० च्या सुमारास आपला डबा पोटभर खाऊन जेवण करुन घ्यावं. ती वेळ चुकूवू नये.

२. चांगल्या दर्जाचे डबे घ्या आणि डब्यातही पातळ भाजी, कोशिंबिर न्या. कोरडी भाजीपोळी किंवा वडे-डोसे जे मिळेल ते असे खाऊ नका.
३. रात्रीचं जेवण साडेसात ते साडेआठच्या दरम्यान घ्यावं. सकाळच्या तुलनेत कमी जेवावं. गोड खाऊ नये. त्यावेळी तुम्ही प्रवासात असाल तर एखादं फळं, भाजीपोळीचा रोल असं खावं. मात्र वेळ चुकवू नये.

(Image :google)

४. वेळ पाळली, लवकर जेवण केलं तर त्याचा शरीराचे स्वास्थ्य राखण्यासाठी उत्तम उपयोग होतो.
५. जेवणाच्या वेळा चुकवणं, रात्री उशीरा जेवण, जागरण हे सारंच तब्येतीसाठी अत्यंत अपायकारक आहे.

Web Title: how to eat early at night, why eating after 7 is not good for health? why eat early dinner, Meal times and health, what is the connection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.