Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain: दिवाळीत गोड तर खावं वाटतं, पण सतत खाऊ की नको खाऊ... या विचारात मन अडकून पडतं.. असं होत असेल तर मिठाई (Diwali Foods and Sweets) खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.(Diwali 2023)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2023 04:00 PM2023-11-08T16:00:34+5:302023-11-08T17:13:41+5:30

4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain: दिवाळीत गोड तर खावं वाटतं, पण सतत खाऊ की नको खाऊ... या विचारात मन अडकून पडतं.. असं होत असेल तर मिठाई (Diwali Foods and Sweets) खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.(Diwali 2023)

How to eat mithai without any guilt in diwali? 4 rules for eating mithai to avoid weight gain | दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

Highlightsमिठाई खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.

दिवाळीचा आनंद तर सगळ्यांनाच असतो. पण त्याच बरोबर हेल्थ कॉन्शियस पण फूडी असणाऱ्या लोकांना दिवाळी (Diwali 2023) आली की प्रचंड टेन्शन यायला लागतं. टेन्शन येण्याचं कारण हेच की आतापर्यंत आपण जिभेवर एवढा कंट्रोल ठेवला आणि वजन नियंत्रणात आणलं. पण आता मात्र दिवाळीचा फराळ, गोडाधोडाचे पदार्थ (Diwali Foods and Sweets) पाहून जिभेवरचा ताबा सुटणार आणि खा- खा खाल्लं जाणार. तुम्हालाही दिवाळीत गोडाधोड खाण्याचं असंच टेन्शन आलं असेल तर गोडधोड खाण्यापुर्वी फक्त या ४ गोष्टी लक्षात घ्या. एवढे नियम पाळले तर गोड खाल्ल्याचा गिल्ट मनात राहणार नाही, वजनही वाढणार नाही (4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain) आणि शिवाय दिवाळीतल्या मिठाईचा मनसोक्त आनंदही घेता येईल. (How to eat mithai without any guilt in diwali?) 

 

दिवाळीत गोड खाऊन वजन वाढू द्यायचं नसेल तर....

१. घरची मिठाई खा

दिवाळीत रवा, बेसन, बुंदीचे लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंज्या असे गोड पदार्थ घरी केले जातात ( Traditional recipes). शिवाय वेगवेगळ्या खिरी, शिरा असंही आपण करतोच. असे घरी केलेले गोड पदार्थ तुम्ही खा. त्यामुळे वजन वाढणार नाही. पण ते कसे खायचे त्याचेही नियम आहेत.

५ पदार्थ, वजन कमी करतील चटकन..

२. गोड पदार्थ कधी खायचे?

गोड पदार्थ खायचा असेल तर त्यासाठी सकाळचा नाश्ता किंवा दुपारची एखादी वेळ, संध्याकाळची वेळ अशी तुमच्या सोयीने एखादी वेळ राखून ठेवा. त्यावेळेत तुम्ही इतर काही खात असाल तर ते टाळून किंवा अगदी कमी खाऊन गोड पदार्थ खा.

 

३. एकावेळी एकच पदार्थ

कितीही गोड खावंसं वाटलं तरीही सगळेच गोड पदार्थ एकाच वेळी खायचे असं मात्र करू नका. एकावेळी एकच गोड पदार्थ खा. जर कंट्रोल झाला नाहीच तर एक पदार्थ सकाळी आणि एक पदार्थ संध्याकाळी असं पथ्य पाळा. 

दिवाळीत कसा लूक कराल? बघा 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची सुंदर स्टाईल- आकर्षक दिसाल

४. हे गोड पदार्थ खाणं टाळा

वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी केलेले पारंपरिक गोड पदार्थ खाऊ शकता. पण कोणते गोड पदार्थ खाऊ नयेत, हे देखील लक्षात घ्या. चॉकलेट्स, ब्राऊनी, शुगर फ्री असे गोड पदार्थ खाणं टाळा. 

 

Web Title: How to eat mithai without any guilt in diwali? 4 rules for eating mithai to avoid weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.