Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

How To Eat Poha For Weight Loss : नाश्ता न केल्यानं तुमचं वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 01:21 PM2024-09-11T13:21:13+5:302024-09-11T13:34:09+5:30

How To Eat Poha For Weight Loss : नाश्ता न केल्यानं तुमचं वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतं.

How To Eat Poha For Weight Loss : Experts Says How To Eat Poha For Weight Loss | नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) नाश्ता हेल्दी असणं फार महत्वाचे असते. जर तुम्ही योग्यवेळी नाश्ता केला तर दिवसभर शरीरात उर्जा टिकून राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता सोडण्याचा विचार बरेच लोक करतात. पण नाश्ता न केल्यानं तुमचं वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतं. वजन कमी करण्यासाठी पोहे एक हेल्दी ऑप्शन आहेत. आहारतज्ज्ञ राधिक गोयल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. राधिका सर्टिफाईड डायटिशिनय आणि न्युट्रिशनिस्ट आहेत. (How To Eat Poha For Weight Loss)

काया क्लिनिकच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम पोह्यांमध्ये जवळपास ११० ते १३० कॅलरीज असतात तर २.४ ग्रॅम प्रोटीन असते. ज्यामुळे मसल्स मेटेंन ठेवण्यास मदत होते. पोहे एक हाय फायबर पदार्थ आहे. पोहे खाल्ल्यानंतर अनावश्यक गोड खाण्याची लालसा कमी होते ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहतं (Ref). पोहे ग्लुटेन फ्री असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पोह्यांच्या सेवनाने पचनाचे विकार टाळण्यास मदत होते. जे लोक ग्लुटेन फ्री डाएट करतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

पोहे खाऊन वजन कसं कमी करायचं? (How To Loss Weight by Eating Poha)

एक्सपर्ट्सच्यामते वजन कमी  करण्यासाठी पोहे हा चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्याची घाई नसेल तर तुम्ही हेल्दी ऑप्शन्सवर लक्ष द्यायला हवं. जर वजन कमी करण्यात तुम्हाला अडथळे येत असतील तर  मेटाबॉलिझ्म स्लो असू शकतो. अशा स्थितीत तुम्ही मेटाबॉलिझ्म बुस्ट करण्याकडे लक्ष द्यायला हवं. पोह्यांमध्ये आयर्न, फॉस्फॉरस, व्हिटामीन सी, व्हिटामीन ए आणि कार्ब्स अधिक प्रमाणात असतात. ज्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.

पाय बारीक मांड्या खूप जाड? डॉक्टर सांगतात रोज 'इतका वेळ' चाला, स्लिम दिसतील मांड्या

वजन जर तुम्हाला वजन  नियंत्रणात ठेवायचं असेल तर पोहे हा उत्तम पर्याय आहे. पोहे पचायला हलके असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. आहारात पोह्यांचा समावेश केल्यास फायबर्ससुद्धा मिळतात. फक्त सकाळच्या नाश्त्याला नाही तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यालाही पोहे खाऊ शकता. 

पोहे कोणत्या पद्धतीने बनवल्यास वजन कमी होण्यास होते  (How To Make Poha in Healthy Way)

वजन कमी  करण्यासााठी कमीत कमी तेलात पोहे बनवा, ऑलिव्ह ऑईलचा वापर करा, पोहे करताना यात भरपूर भाज्या घाला. प्रोटीनसाठी तुम्ही यात पनीर घालू शकता. हेल्दी फॅट्ससाठी शेंगदाणे किंवा काजूसुद्धा घालू शकता. पोहे खाताना पोर्शन कंट्रोलवर लक्ष द्या  पोह्यांना वाफेवर शिजवण्याची आवश्यकता सते ज्यामुळे जास्त तेल लागत नाही. 

Web Title: How To Eat Poha For Weight Loss : Experts Says How To Eat Poha For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.