Join us  

रात्री भात खाल्ला की पोट सुटतं? डॉक्टर सांगतात भात शिजवण्याच्या ३ ट्रिक्स, स्लिम-मेंटेन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:40 PM

How To Eat Rice For Weight Loss : एक्सपर्ट्सच्यामते वेट लॉस डाएटमध्ये भाताचा समावेश केल्यास त्यातील स्टार्च बाहेर काढणं गरजेचं असतं.

लठ्ठपणाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या आजाराचे शिकार झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी लोकं सगळ्यात आधी भात खाणं सोडतात. त्यांना असं वाटतं की भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. आहार आणि पोषण विशेषज्ञ डॉ. आदिती शर्मा यांच्यामते भात खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. कसं ते समजून घेऊ. (How To Loss Weight Faster Weight Loss Tips)

फॅट बर्न करण्याचा आणि वजन कमी करण्याचा मुद्दा बराच व्हायरल होत आहे. भात खायचा की नाही  (How To Eat Rice For Weight Loss) याबाबत बरेच लोक गोंधळात असतात.  भात खाणं सोडणं योग्य आहे की नाही ते समजून घ्यायला हवं. आहारतज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (5 Ways To Eat Rice For Weight Loss Right Way to Eat Rice)

डॉ. सांगात भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो पण भात शिजवण्याची पद्धत योग्य असेल तर लठ्ठपणा येत नाही. री लाईफस्टाईल आणि जंक फूडचे जास्त सेवन लठ्ठपणा वाढण्याचे कारण ठरतात. भात खात असताना तुम्ही वजन कमी करू शकता. 

वजन कमी करण्यासाठी भात कसा शिजवावा

एक्सपर्ट्सच्यामते वेट लॉस डाएटमध्ये भाताचा समावेश केल्यास त्यातील स्टार्च बाहेर काढणं गरजेचं असतं. स्टार्च रिमुव्ह करण्यासाठी तांदूळ शिजवण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. आजकाल लोक प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतात. ज्यामुळे स्टार्च पूर्णपणे निघत नाही.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार स्टार्च काढल्यानंतर प्रेशर कुकरऐवजी पातेल्यात शिजवा. अधिक पाण्यात भात उकळून घ्या. तांदूळ शिजल्यानंतर त्यातलं पाणी बाहेर काढून घ्या आणि उरेललं पाणी सुद्धा गाळा. या प्रोसेसमुळे स्टार्च पाण्यासोबत निघून जाते. आणि तुम्ही स्टार्च फ्री भात इन्जॉय करू शकता.

उन्हामुळे आग होते- नुसत्या घामाच्या धारा? रामदेव बाबा सांगतात १ उपाय-थंड वाटेल, घाम येणार नाही 

ब्राऊन राईस एक हेल्दी पर्याय

वेट लॉस डाएटमध्ये व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईसचा समावेश करा. बासमती जास्मीन राईसचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता. ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही. याशिवाय यात फायबर्सही जास्त असतात. कॅलरी इंटेक कमी प्रमाणात असतो. ब्राऊन राईस वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो. 

केस पातळ झालेत? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून मसाज करा; घनदाट, लांंब होतील केस

क्वांटिटीकडे लक्ष द्या

वजन कमी करण्यासाठी भाताचे पोर्शन कंट्रोल म्हणजेच तुम्ही किती प्रमाणात भात खाता याकडे लक्ष द्या.  भाताचे सेवन करणं वजन कमी करण्यासाठी वेट लॉस जर्नीसाठी उत्तम ठरत नाही. भाताचा छोटा बाऊल पुरेसा आहे. ज्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही.

प्रोटीन आणि भाताचे कॉम्बिनेशन

वजन कमी करण्यासाठी आहारात भाताबरोबर प्रोटीन्सचा समावेश करा. भात खाल्ल्याने तुम्हाला बराचवेळ काही खावंस वाटणार नाही. ओव्हर इटींग होत नाही याशिवाय सतत भूकही लागत नाही. अधिकाधिक कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी हा महत्वाचा फॅक्टर आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य