जेव्हा वजन कमी करण्यााचा विषय येतो तेव्हा आपण खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी वगळतो किंवा अनेक कडक नियंमाचे पालक करतो. इतकचं नाही तर काहीजण चपाती, भात खाणं ही सोडून देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काहीही सोडण्याची गरज नाही. भात खाणं न सोडता तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी भात खाण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. (Ways you can eat white rice and still lose weight)
वजन कमी करण्याच्या सुरूवातीला भात न खाण्याचा प्रयत्न करू नका. चुकून भात खाल्ला तर तुम्हाला पश्चाताप होतो. हे टाळायचे नसेल तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. जेणेकरून तुम्ही भात खाऊनही मेंटेन राहू शकाल. तुम्ही कोणता भात खाता किंवा किती प्रमाणात खाता हे सुद्धा महत्वाचे असते. यासाठीच एक मध्यम आकाराची वाटी घ्या त्यात आपल्याला वाटतील तितके तांदूळ घ्या. (Tips to eat white rice and still lose weight)
प्रोटीन्सनी परिपूर्ण डाळी आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. भातामुळे वजव वाढेल अशी चिंता करण्याची गरज नाही. यासाठी आपल्या ताटात प्रोटिन्स असतील असे पाहा. भाताबरोबर फळं, भाज्या, दाळी, राजमा, छोले अशा पदार्थांचा समावेश करा. ताटात भात घेण्याआधी डाळी आणि भाज्यांचा समावेश करा. (How to eat rice without gaining weight)
डाळ-तांदळाच्या ताटात प्रोबायोटिक्सचा समावेश करा. ताटात दह्याचा समावेश करा. दह्यात प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. आहारात डाळी- भाज्यांचा समावेश करा. आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करा. प्रोबायोटिक्समुळे खाल्लेल्या अन्नचे पचन व्यवस्थित होईल.
रिसर्च काय सांगतो?
रिसर्चनुसार पांढरा भात खाण्याऐवजी ब्राऊन राऊस खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. इतकंच नाही, ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून ३० मिनिटं वेगाने चाला. रोज डाएटमध्ये फायबर्स खाऊन १०० कॅलरीज कमी करू शकता.
साध्या आहारातून प्रोटीन-कॅल्शियम हवंय? सकाळी उठल्यानंतर खा ५ पदार्थ: एनर्जेटिक-फिट राहाल
सिंगल मीलमध्ये भाताचे एकचे सर्विंग असावे. यात कॅलरीज इन्टेक कमी होते. तांदळात कार्बोहायट्रेस असतात. म्हणूनच जास्त भात खाण्याबरोबरच जास्त कार्ब्स खाण्याची चूक करू नका. भातात तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालून शिजवा. भाज्यांबरोबर प्रोटीन्स, फायबर्स असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.
चपातीऐवजी 'हा' पदार्थ खाऊन जया किशोरींनी घटवलं वजन; १५ दिवसांत वेट लॉस करण्याचे सिक्रेट
भातबरोबर बीन्स, शिमला मिरची, ब्रोकोली, टोफू, पनीरचे सेवन करा. भात जास्त तेलात फ्राय न करता पाण्यात उकळवून भाज्यांचे सेवन करा. भाज्या नेहमी पाण्यासोबत उकळून यांचे सेवन करा. अतिरिक्त पाणी फेकून द्या. जेणेकरून तांदळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल.